मुंबई: IPLपाठोपाठ बीसीसीआयच्या हातून आणखी एक मोठी स्पर्धा गेली आहे. भारतातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता टी 20 वर्ल्ड कप भारताबाहेर घेऊन जाण्याचा निर्णय ICC ने घेतला आहे. BCCIने अधिकृतरित्या याची घोषणा केली. याच सोबत टी 20 वर्ल्ड कपचा तारखाही जाहीर करण्यात आल्या आहेत. UAEमध्ये आयपीएलपाठोपाठ आता टी 20 वर्ल्ड कपचे सामने खेळवले जाणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

UAE सोबक ओमनमध्ये देखील टी 20 वर्ल्ड कपचे सामने खेळवण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर कालावधीत वर्ल्ड कप होणार असल्याची माहिती मिळाली आहे. भारतातील कोरोनाची स्थिती आणि तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन भारतात टी 20 वर्ल्ड कप आयोजित केला जाणार नसल्याची माहिती मिळाली आहे. 



IPL पाठोपाठ आता टी 20 वर्ल्ड कप भारताबाहेर खेळवला जाणार आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान टी 20 वर्ल्ड कपचे सामने UAEमध्ये खेळवले जाणार असल्याची माहिती BCCIचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिली.



पहिल्या टप्प्यात 8 टीममध्ये 12 सामने खेळवले जाणार आहेत. यामध्ये 4 (प्रत्येक ग्रूपमधून 2) असे सामने खेळवल्यानंतर सुपर 12 साठी टीम क्वालिफाइड केल्या जाणार आहेत. या टीम बांग्लादेश, श्रीलंका, आयरलँड, नीदरलँड, स्कॉटलँड, नामीबिया, ओमान, पापुआ न्यू गिनी या टीम रँकिंग 8 टीम विरुद्ध सामने खेळून सुपर 12 पर्यंत पोहोचणार आहेत. 


सुपर 12 मध्ये एकूण 30 सामने खेळवले जाणार आहेत. 23 ऑक्टोबरपासून हे सामने सुरू होतील. यामध्ये 6-6 अशी दोन ग्रूपमध्ये विभागणी असेल. हे सामने दुबई, अबू धाबी आणि शारजाह इथे खेळवले जाणार आहेत. त्यानंतर 3 नॉकआउट सामने होणार आहेत. दोन सेमीफायनल आणि एक फायनल असा संपूर्ण शेड्युल असणार आहे.