दुबई: टीम इंडियाला पाकिस्तानने 10 विकेट्सने पराभूत केलं आहे. बाबर आणि रिझवान या सलामी जोडीनं टीम इंडियाच्या बॉलर्सना जेरीस आणलं. एकही विकेट मिळू दिली नाही. इतकच नाही तर दोघांनीही टीम इंडियाने दिलेलं लक्ष्यही गाठलं. आता टीम इंडियाचा पुढचा सामना रविवारी न्य़ूझीलंड विरुद्ध होणार आहे. हा सामना जिंकणं टीम इंडियासाठी खूप गरजेचं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाला न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात एक चूकही खूप मागात पडू शकते. एक चुकीमुळे टी 20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडण्याची वेळ येऊ शकते. हा सामना करो या मरो सारखा होणार आहे. पाकिस्तान संघ 2 सामने जिंकला आहे. टीम इंडिया पॉइंट टेबलमध्ये पाचव्या स्थानावर आहे. जर टीम इंडियाला फायनलपर्यंत पोहोचायचं असेल तर रविवारचा सामना जिंकणं गरजेचं आहे.


टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी सध्या खराब फॉर्ममध्ये आहे. पाकिस्तान विरुद्ध सामन्यात शमीच्या बॉलवर पाकच्या खेळाडूंनी बऱ्याच धावा लुटल्या. त्यावरून शमीला ट्रोल देखील करण्यात आलं आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात जर शमीने चांगली कामगिरी केली नाही. तर तो टीममधून बाहेर जाणार हे निश्चित असल्याचं सांगितलं जात आहे. 


मोहम्मद शमीच्या बॉलमध्ये ती जादू राहिली नाही जी याआधी होती असंही अनेक दिग्गज क्रिकेटपटूंचा दावा आहे. तर दुसरीकडे अश्विनला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळावी याची तो खूप वाट पाहात आहे. आर अश्विन संधी कोहली कधी देणार हे पाहाणंही महत्त्वाचं ठरणार आहे. 


हार्दिक पांड्या आणि भुवनेश्व कुमार हे देखील आपल्या खराब फॉर्ममध्ये आहेत. 31 ऑक्टोबरला होणारा सामना भारताच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. सेमीफायनल पर्यंत पोहोचण्यासाठी भारताला हा सामना जिंकणे अत्यंत महत्त्वाचे आहे. T20 वर्ल्ड कप स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 2 सामने झाले असून, दोन्ही वेळा किवींनी विजय मिळवला आहे. भारतालाही हा सामना जिंकणारा इतिहास बदलायचा आहे.