दुबई: टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान महामुकाबला सुरू आहे. पाकिस्तान संघाने टॉस जिंकून पहिल्यांदा क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. शाहिन आफ्रिदीने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. तर टीम इंडियाने पहिल्यांदा फलंदाजी करून 152 धावांचं आव्हान पाकिस्तान संघाला दिलं आहे. पाकिस्तानचा हा निर्णय पूर्णपणे योग्य होता आणि टीम इंडियाचे सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुल जास्त धावा न करताच बाद झाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाहीन शाह आफ्रिदीच्या घातक गोलंदाजीवर रोहित बाद झाला. त्यानंतर के एल राहुलला आऊट करण्यात आलं. मात्र तो नो बॉल असल्याची चर्चा सुरू झाली. के एल राहुलवर अन्याय झाल्याचंही सोशल मीडियावर नेटकरी म्हणत आहेत. मैदानात अंपायरकडून मोठी चूक झाल्याचा दावा नेटकऱ्यांनी केला आहे. 


केएल राहुल पाकिस्तानविरुद्ध फ्लॉप ठरला. शाहिन शाह आफ्रिदीने त्याची विकेट काढली. राहुल 3 धावा करून बोल्ड झाला. क्रिकेटप्रेमींनी ट्विटरवर के एल राहुलला नो बॉलवर आऊट दिल्याबद्दल ट्वीट करून संताप व्यक्त करत आहेत. 


सोशल मीडियावर क्रिकेटप्रेमींनी शाहिन आफ्रिदीच्या बॉलिंगचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये पाहू शकता की त्याचा पाय क्रीझच्या थोड पुढे असल्याचं दिसत आहे. टीम इंडियाला के एल राहुलकडून खूप आशा होत्या. के एल राहुलने आऊट झाल्यानंतर थर्ड अंपायरचा निर्णय न घेता मैदान सोडलं. दुसरीकडे अंपयारनेही थर्ड अंपायरचा निर्णय दिला नाही. थेट के एल राहुलला आऊट दिलं. अंपायरची ही चूक राहुलवर अन्याय करणारी ठरली.






टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन 


केएल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली ( कर्णधार),सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, वरूण चक्रवर्ती, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह


पाकिस्तान प्लेइंग इलेव्हन


बाबर आजम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), फखर जमां, मोहम्मद हाफीज, शोएब मलिक, आसिफ अली, इमाद वसीम, शादाब खान, हसन अली, हारिस रऊफ आणि 


शाहिन आफ्रिदी