T20 World cup 2021 | ठरलं! या दिवशी टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान भिडणार
टी 20 वर्ल्ड कपमध्ये ( T20 World Cup 2021) टीम इंडिया (Team India) नेहमीच पाकिस्तानवर (Pakistan) वरचढ राहिली आहे.
मुंबई : आयसीसीने (ICC) काही दिवसांपूर्वी टी 20 वर्ल्ड कपची (T20 World cup 2021) तारीख आणि ग्रृप जाहीर केलं होतं. त्यानुसार या स्पर्धेचं आयोजन हे 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान करण्यात आलं आहे. तसेच टीम इंडिया पाकिस्तान हे दोन्ही कट्टर संघ एकाच ग्रृप 2मध्ये आहेत. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना अनेक वर्षानंतर हायव्होलटेज सामना अनुभवता येणार असल्याचं स्पष्ट झालं होतं. पण हा धमाकेदार सामना केव्हा होणार, हे निश्चित नव्हतं. दरम्यान हे दोन्ही संघ आमनेसामने केव्हा भिडणार आहेत, ती तारीख आता समोर आली आहे. (T20 World Cup 2021 India and Pakistan will be played on October 16)
केव्हा होणार सामना?
हे दोन्ही संघ 24 ऑक्टोबरला आमनेसामने भिडणार आहेत. टीम इंडियाने आतापर्यंत टी 20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान विरुद्ध एकही सामना गमावलेला नाही. तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानला टीम इंडियाला एकदाही पराभूत करणं जमलेलं नाही. त्यामुळे यंदाही पाकिस्तानचा पराभव करत विजयी मालिका कायम ठेवण्याचा मानस टीम इंडियाचा असणार आहे.
टी 20 वर्ल्ड कपमधील उभयसंघांची कामगिरी
दोन्ही संघ टी 20 वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत एकूण 5 वेळा आमनसामने भिडले आहेत. या 5 ही वेळेस टीम इंडिया पाकिस्तावर वरचढ राहिली आहे. भारताने पाकिस्तानचा पाचही सामन्यात पराभव केला होता. टी 20 वर्ल्ड कपमधील पहिला सामना हे दोन्ही 14 सप्टेंबर 2007 ला भिडले होते. हा सामना बरोबरीत सुटला होता. त्यानंतर बॉल आऊट द्वारे सामना निकाली काढण्यात आला. या बॉलआऊटमध्ये भारताने पाकिस्तानला पराभूत केलं.
अखेरचा सामना कधी?
दोन्ही संघ अखेरीस टी 20 वर्ल्ड कपमध्ये 19 मार्च 2016 मध्ये आमनेसामने आले होते. या मॅचमध्ये भारताने पाकिस्तानला 6 विकेट्सने पराभूत केलं होतं.
4 मैदानांवर स्पर्धेचं आयोजन
आयसीसीने 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान या स्पर्धेचं आयोजन केलं आहे. या स्पर्धेचं आयोजन हे कोरोनामुळे भारताऐवजी दुबई आणि ओमानमध्ये केलं आहे. स्पर्धेतील सर्व सामन्यांचे आयोजन हे एकूण 4 मैदानांमध्ये केलं आहे. यामध्ये दुबईतील 3 तर ओमानमधील 1 स्टेडियमचा समावेश आहे. यामध्ये दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, शेख झायेद स्टेडिमय, शारजाह स्टेडियम आणि ओमान क्रिकेट अॅकेडमी ग्राउंडवर हे सामने पार पडणार आहे.
टी-20 वर्ल्ड कप 2021साठी असे आहेत ग्रृप
राउंड 1
ग्रुप ए : श्रीलंका, आयरलंड, नेदरलंड आणि नामीबिया
ग्रुप बी : बांग्लादेश, स्कॉटलंड, पापुआ न्यू गुएना (पीएनजी) आणि ओमन.
सुपर-12
ग्रुप 1 : इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण अफ्रीका, वेस्टइंडीज, ए1 आणि बी2
ग्रुप 2 : भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, अफगानिस्तान, ए2 और बी1.