दुबई: ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड सामन्याची उत्सुकता खूप शिगेला पोहोचली आहे. पाकिस्तान संघाला शेवटच्या 3 ओव्हरमध्ये बाजी पलटवून पराभूत करणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा न्यूझीलंड विरुद्ध महाअंतिम सामना होणार आहे. या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. दोन्ही संघ अत्यंत उत्तम कामगिरी करणारे आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 T20 World Cup 2021 Final सामना 14 नोव्हेंबर रोजी दुबईमध्ये होणार आहे. ऑस्ट्रेलिया दुसऱ्यांदा अंतिम फेरीपर्यंत पोहोचलं आहे.तर न्यूझीलंडची ही पहिलीच वेळ आहे. दोन्ही संघांना आतापर्यंत एकदाही ही ट्रॉफी जिंकण्यात यश आलं नाही.  T20 World Cup 2021 मध्ये ही ट्रॉफी मिळवण्याचा मान कोणत्या संघाला मिळणार याची उत्सुकता आहे. 


वेस्ट इंडिजने 2 टी-20 विजेतेपद पटकावले आहेत. भारत, पाकिस्तान, इंग्लंड आणि श्रीलंकेने प्रत्येकी एकदा ट्रॉफी जिंकली आहे. न्यूझीलंड संघाने सेमीफायनल सामन्यात इंग्लंडवर पाच गडी राखून विजय मिळवला होता. यासोबतच न्यूझीलंडने एकदिवसीय विश्वचषक-2019 च्या अंतिम सामन्यात इंग्लंडविरुद्धच्या पराभवाचा बदलाही घेतला. न्यूझीलंड तीन वर्षांत तिसऱ्यांदा फायनल खेळणार आहे. 


न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. 7.00 वाजता नाणेफेक होणार आहे. तर सामन्याला 7.30 वाजता सुरुवात होईल. या सामन्याचं थेट प्रक्षेपण Star Sports 1, Star Sports 2 आणि Star Sports 3 वर पाहता येणार आहे. याशिवाय मोबाईलवर क्रिकेटप्रेमींना Disney+ Hotstar वर पाहता येणार आहे.