दुबई : न्यूझीलंडने रविवारी टी-20 विश्वचषकात अफगाणिस्तानाला हरवून विजय मिळवल्याने भारताचे चॅम्पीयन्स होण्याचे स्वप्न भंगले. न्यूझीलंडने अफगाणिस्तानचा 8 गडी राखून पराभव केला, त्यानंतर टीम इंडिया टी-20 विश्वचषकाच्या गट फेरीतून बाहेर पडली. भारत आणि नामिबिया यांच्यातील सोमवारी म्हणजे आज होणारा सामना हा कोहलीच्या टी-20 कर्णधारपदाचा शेवटचा सामना असेल. 2021 च्या टी20 विश्वचषकानंतर कोहलीने टी20 कर्णधारपद सोडणार असल्याचे त्याने आधीच जाहीर केले होते. यावेळी भारताला विश्वचषकात (T20 आणि ODI) प्रथमच पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला आणि त्यानंतर न्यूझीलंडकडून देखील हार पत्कारावी लागली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शास्त्री आणि त्यांच्या कोचिंग स्टाफचा देखील हा शेवटचा सामना असेल. टी-20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडल्यानंतर टीम इंडिया, विराट कोहली आणि निवड समितीवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या T20 विश्वचषकात असे 3 खेळाडू होते, ज्यांची कामगिरी अत्यंत खराब राहिली. निवडकर्त्यांनी या तीन खेळाडूंना टीम इंडियामध्ये संधी दिली परंतु हे खेळाडू या संधीचा फायदा उचलू शकले नाहीत, ज्यामुळे त्यांचे करिअर आता संपुष्टात आले आहे.


1. वरुण चक्रवर्ती


वरुण चक्रवर्तीला T20 वर्ल्डकपमध्ये संधी देणे ही टीम इंडियाच्या निवडकर्त्यांची सर्वात मोठी चूक ठरली. आयपीएलमधील धमाकेदार कामगिरी पाहून वरुण चक्रवर्तीला टी-20 वर्ल्डकपच्या संघात संधी देण्यात आली, मात्र या स्पर्धेत येताच त्याची पोल उघड झाली. वरुण चक्रवर्तीला T20 विश्वचषकातील 3 सामन्यात एकही विकेट मिळाली नाही. युझवेंद्र चहलसारख्या दमदार लेग-स्पिनरच्या जागी वरुण चक्रवर्तीला संधी देण्यात आली, पण निवडकर्त्यांना त्याच्या चुकीबद्दल पश्चाताप होईल.


2. भुवनेश्वर कुमार


31 वर्षीय वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार फॉर्ममध्ये नसतानाही निवडकर्त्यांनी त्याला टी-20 विश्वचषकासाठी संधी दिली. हा निर्णय टीम इंडियाला खूप महागात पडला आहे. भुवनेश्वर कुमारला या स्पर्धेत फक्त पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली, पण त्याच्या बॉलवर त्यांनी जोरदार फटकेबाजी केली.


यानंतर न्यूझीलंड, अफगाणिस्तान आणि स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यात भुवनेश्वर कुमारला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले. टीम इंडियाच्या या खेळीवरून आता भुवनेश्वर कुमारची कारकीर्द संपण्याच्या मार्गावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. भुवनेश्वर कुमारकडे ना वेग आहे ना स्विंग, ज्यामुळे तो टीम इंडियात आपले स्थान पक्के करू शकला नाही.


3. हार्दिक पंड्या


टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या बऱ्याच दिवसांपासून फॉर्म आणि फिटनेसच्या समस्येशी झुंजत आहे.
या T20 विश्वचषकात हार्दिक पांड्याची कामगिरीही अत्यंत खराब होती, त्यानंतर त्याच्या स्थानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. हार्दिक पांड्याला कंटाळून भारतीय संघ व्यवस्थापन लवकरच दुसऱ्या अष्टपैलू खेळाडूला संधी देण्याचा विचार करू शकते. IPL 2021 मध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतर एक खेळाडू खूप चर्चेत होता. परंतु आता मात्र तो त्याचा खेळा दाखवू शकला नाही.