दुबई : आयसीसी टी-२० विश्वचषकात रविवारी भारताला न्यूजीलँडकडून मिळालेल्या पराभवामुळे भारतीय चाहत्यांची मनं मोडली. T20 विश्वचषक जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार असलेली टीम इंडिया आता उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडण्याच्या मार्गावर पोहोचली आहे. ज्यामुळे आता टीम इंडियासाठी सेमीफायनलचे दरवाजे जवळपास बंदच झाले आहेत. टीम इंडियाला आपल्या गटात पाकिस्तान आणि न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला आहे. टीम इंडियाच्या सलग दोन पराभवानंतर भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने धक्कादायक खुलासा केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जसप्रीत बुमराहने टीम इंडियाला पराभवाचा सामना का करावा लागला? यामागचे कारण स्पष्ट केलं आहे.


जसप्रीत बुमराह म्हणाला, "तुम्हाला कधीकधी ब्रेकची गरज असते. तुम्हाला तुमच्या कुटुंबाची आठवण येते. तुम्ही सहा महिने सतत खेळत आहोत. त्यामुळे कुठेतरी मनावर त्याचा परिणाम होतो, पण मैदानावर असताना तुम्ही त्याचा विचार करत नाही. तुम्ही बऱ्याच गोष्टी नियंत्रणात ठेवू शकत नाही. बबलमध्ये राहणे आणि इतके दिवस आपल्या कुटुंबापासून दूर राहणे, याचा खेळाडूच्या मनावर परिणाम होतो."


न्यूझीलंडविरुद्धचा सामना गमावल्यानंतर बुमराह म्हणाला, 'तुम्ही एकदा नाणेफेक गमावली की दुसऱ्या डावात खेळ बदलतो. त्यामुळे गोलंदाजांना थोडा वाव द्यावा, असे मला वाटले. अशीच चर्चा फलंदाजांबाबत होत होती. आम्ही थोडे लवकर आक्रमक झालो आणि लांब बाउंड्रीलाईन मुळे काही त्रास झाला. त्यांनी स्लो बॉल खेळत चांगला खेळ दाखवला. त्याने विकेटचा शानदार वापर केला, ज्यामुळे आमच्या फलंदाजांना मोठे फटके मारणे कठीण केले. आम्हाला सिंगल्स देखील काढणे शक्य नव्हते.


टीम इंडियाच्या पराभवानंतर कोहलीची प्रतिक्रिया


आयसीसी टूर्नामेंटमध्ये टीम इंडियाच्या पराभवुानंतर कर्णधार विराट कोहलीचा संयम सुटला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या या पराभवानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली म्हणाला, 'टीम इंडियाच्या खेळाडूमध्ये धैर्याची कमतरता होती आणि बॉडी लॅग्वेज चांगली नव्हती. न्यूझीलंडच्या संघाने जे दडपण निर्माण केले, ते सामन्याच्या शेवटपर्यंत कायम राहिले.


भारतीय फलंदाजांच्या खराब कामगिरीवर कर्णधार कोहली म्हणाला की, न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यादरम्यान भारतीय फलंदाज शॉट्स खेळण्यास थोडे चाचपटत होते. त्यामुळे मोठे शॉट्स खेळताना भारतीय बाद झाले.


कोहलीने सांगितले पराभवाचे सर्वात मोठे कारण


विराट कोहली म्हणाला, 'आम्ही जास्त धावा केल्या नाहीत, पण ते वाचवण्यासाठी देखील आम्ही हिंमत दाखवून उतरलो नाही.'


“जेव्हा तुम्ही भारतीय क्रिकेट संघासाठी खेळता तेव्हा केवळ चाहत्यांच्याच नाही तर खेळाडूंच्याही खूप अपेक्षा असतात. अपेक्षा नेहमीच असतील आणि आम्ही त्यांना इतक्या वर्षांपासून तोंड देत आहोत. भारताकडून खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूला ते करावेच लागते.


न्यूझीलंडकडून भारताचा पराभव


टीम इंडियाने 7 गड्यांच्या मोबदल्यात 110 धावांची माफक धावसंख्या उभारली, जी न्यूझीलंड संघासाठी काहीच नव्हती. किवी संघाने ते पंधरा षटकांत गाठले. भारतीय संघाच्या फलंदाजीत प्रत्येक फलंदाज फ्लॉप ठरला. रवींद्र जडेजाने सर्वाधिक २६ धावांची खेळी खेळली. या पराभवानंतर टीम इंडियाचा पुढचा मार्ग कठीण झाला आहे. भारतीय संघाच्या पराभवानंतर चाहत्यांनीही ट्विटरवर आपला राग व्यक्त केला आणि आयपीएलवर बंदी घालण्याची मागणीही केली. संघाच्या खराब कामगिरीमुळे चाहते चांगलेच नाराज झाले होते.