T20 World cup: या संघाने दिलेल्या जखमेमुळे जिंकलो, बेन स्टोक्सची कबुली
T20 World cup 2022 : इंग्लंड संघाने पाकिस्तानवर 5 विकेटने विजय मिळवत फायलन जिंकली.
ICC T20 World cup 2022 final : इंग्लंड संघाने दुसऱ्यांना टी20 वर्ल्डकपवर आपलं नाव कोरलं आहे. या विश्वचषकात बरीच चढाओढ पाहायला मिळाली. शेवटी पाकिस्तान आणि इंग्लंड संघ फायनलमध्ये पोहोचले. पण दोन्ही संघासाठी फायनलपर्यंत पोहोचण्याचा मार्ग इतका सोपा नव्हता. इंग्लंड संघाला सुरुवातीलाच आयर्लंडकडून पराभव धक्का सहन करावा लागला होता.
आयर्लंडकडून पराभवानंतर इंग्लंडने जोरदार कमबॅक केले आणि शेवट गोड केला. हे कसे घडले? याबाबत फायनल सामन्याचा हिरो ठरलेल्या बेन स्टोक्सने खुलासा केला आहे.
फायनल सामन्यात स्टोक्सने दबावाच्या परिस्थितीत शानदार अर्धशतक झळकावले. त्याने विजयानंतर सांगितले की, 'ग्रुप स्टेजमध्ये आयर्लंडकडून पराभूत झाल्यामुळे संघ निराश झाला होता. खेळाडूंना पुढच्या सामन्यांकडे लक्ष दिले. शेवटी यश मिळाले. आम्हाला तो पराभव (आयर्लंडविरुद्ध) स्पर्धेच्या सुरुवातीलाच मिळाला." यावर नक्कीच मात करून पुढे जायचे होते. अशा स्पर्धेत पराभवाचे ओझे तुम्ही उचलू शकत नाही. आमच्याकडून ही एक छोटीशी चूक झाली होती आणि श्रेय आयर्लंडला जाते ज्यांनी आम्हाला हरवले पण सर्वोत्तम संघ त्यांच्या चुकांमधून शिकतो.'
इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरकडे या वर्षाच्या सुरुवातीलाच टी20 फॉरमॅटचं कर्णधारपद सोपवण्यात आलं होतं. त्यामुळे त्याच्यापुढे ही मोठं आव्हान होतं. यावेळी जोस बटलर म्हणाला की, टी-20 विश्वचषकातील विजयाचा आता प्रत्येकाला अभिमान वाटतो. हा एक लांबचा प्रवास आहे ज्याने काही बदल देखील केले आहेत. गेल्या काही वर्षांत आम्ही दाखवलेल्या खेळाचा फायदा आम्हाला मिळाला. आयर्लंडच्या सामन्यानंतर आमच्या खेळाडूंनी इतर सामन्यांमध्ये जबरदस्त उत्साह दाखवला.'