ऑस्ट्रेलिया : आजपासून टी-20 वर्ल्डकपला सुरुवात झाली आहे. यंदाचा वर्ल्डकप ऑस्ट्रेलियामध्ये खेळवला जात असून श्रीलंका विरूद्ध नामीबिया असा पहिला सामना रंगला होता. दरम्यान वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात मोठा उटलफेर पहायला मिळाला. या सामन्यात नामीबियासारख्या छोट्या टीमने श्रीलंकेच्या टीमचा पराभव केलाय. त्यामुळे पहिल्याच सामन्यात श्रीलंकेला मोठा धक्का बसला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सामन्यात श्रीलंकेने प्रथम टॉस जिंकून फिल्डींगचा निर्णय घेतला होता. मात्र हा निर्णय श्रीलंकेसाठी फायदेशीर ठरला नाही. नामीबियाच्या टीमने प्रथम फलंदाजी करत श्रीलंकेच्या टीमला 164 रन्सचं आव्हान दिलं होतं. मात्र या लक्षाचा पाठलाग करताना लंकेची टीम अवघ्या 108 रन्सवर ऑल आऊट झाली आणि वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात नामीबियाचा विजय झाला.


या सामन्यापूर्वी श्रीलंका टीमचं पारड जड मानलं जातं होतं. कारण नुकतंच श्रीलंकेच्या टीमने आशियाच्या सर्व टीम्सला धूळ चारत आशिया कप आपल्या नावे केला होता. त्यामुळे पहिला सामना श्रीलंकाच जिंकणार असं अनेकांनी गृहीत धरलं होतं. मात्र सामन्यात मोठा उलटफेर पहायला मिळाला. दरम्यान आता पहिल्याच सामन्या यंदाचा वर्ल्डकप पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.