Virat Kohli : T20 World Cup मध्ये विराट कोहलीच्या जोरदार खेळीनंतर गौतम गंभीरचं मोठं वक्तव्य...
Virat Kohli in T20 World Cup-2022 : भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरोधात तर एकहाती मॅच जिंकून त्यांने क्रिकेट विश्वात एक वेगळीच झाप पाडली. विराट कोहलीची आतापर्यंतची कामगिरी पाहून देशभरात त्याचं कौतुक होतं आहे. विराटवर अनेकदा टीका करणाऱ्या गौतम गंभीरने त्याचाबद्दल मोठं विधान केलं आहे.
Gautam Gambhir on Virat Kohli : T20 World Cup-2022 मध्ये टीम इंडियाने (Team India) चांगली कामगिरी करत सेमी फायनलमध्ये (T20 World Cup-2022 semi final) आपली जागा जवळपास निश्चित केली आहे. टीम इंडियाचा चांगल्या कामगिरीसाठी अनेक खेळाडूंचा समावेश आहे. पण खास नाव घ्यायचं असेल तर विराट कोहली (Virat Kohli)...आतापर्यंतच्या मॅचमध्ये विराटच्या बॅटने तुफान खेळी केली आहे. भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरोधात तर एकहाती मॅच जिंकून त्यांने क्रिकेट विश्वात एक वेगळीच झाप पाडली. विराट कोहलीची आतापर्यंतची कामगिरी पाहून देशभरात त्याचं कौतुक होतं आहे. विराटवर अनेकदा टीका करणाऱ्या गौतम गंभीरने त्याचाबद्दल मोठं विधान केलं आहे.
बाबर आणि स्मिथ पेक्षा...
विराटवर अनेकदा टीका करणाऱ्या गौतम गंभीरने (Gautam Gambhir) आता त्याचं कौतुक केले आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam), ऑस्ट्रेलियाचा दिग्गज स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) आणि न्यूझीलंडचा महान खेळाडू जो रूट (Joe Root) यांच्यापेक्षा विराट कसा सरस आहे हे गंभीरने सांगितलंय...त्यामुळे क्रिकेटविश्वात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. गंभीरने ब्रॉडकास्टर वाहिनीला सांगितले की, 'विराट कोहलीला खेळाडूंसोबत भागीदारी कशी करायची हे माहित आहे. सरतेशेवटी त्याने खेळ चांगला संपवला आणि सूर्या आऊट झाल्यानंतर तो आज खरा हिरो बनला. यामुळेच तो बाबर, स्मिथ, विल्यमसन (Kane Williamson), जो रूट या खेळाडूंपेक्षा सरस आहे. (T20 World Cup 2022 Gautam Gambhir on Virat Kohli nmp)
महेला जयवर्धनेपेक्षा कोहली बेस्ट
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यादरम्यान विराट कोहली टी-20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही ठरला. त्याने महेला जयवर्धनेचा (Mahela Jayawardene) विश्वविक्रम मोडला. T20 विश्वचषकात कोहलीची सरासरी 80 च्या वर आहे आणि त्याचा स्ट्राइक रेट 130 पेक्षा जास्त आहे. एवढेच नाही तर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याची एकूण सरासरी 53 पेक्षा जास्त आहे.