Rohit Sharma Record : T20 का किंग कौन... हिटमॅन! रोहित शर्मा ख्रिस गेलचा `हा` रेकॉर्ड मोडणार का?
Rohit Sharma Six Record: रोहितने अलीकडेच T20 विश्वचषकात (T20 WC 2022) भारतीय फलंदाज म्हणून रोहित शर्माने सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत युवराज सिंहला मागे टाकले आणि आता त्याच्या लक्ष्यावर आणखी एक उत्कृष्ट विक्रम आहे.
Rohit Sharma Sixes in International Cricket: क्रिकेट रेकॉर्डस्बद्दल चर्चा होत असताना त्यात रोहित शर्माचे (Rohit Sharma) नाव नाही, असे होऊ शकत नाही. क्रिकेटविश्वात 'हिटमॅन' (Hitman) म्हणून ओळखला जाणारा टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा जेव्हा खेळतो तेव्हा कोणत्याही गोलंदाजाला ते अवघड होऊन बसते. मुंबईत राहणाऱ्या या दिग्गजाच्या नावावर प्रत्येक फॉरमॅटमध्ये शतक आहे. सध्या रोहित टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 world Cup 2022 ) टीम इंडियाचे (team India) नेतृत्व करत आहे. 15 वर्षानंतर टी-20 विश्वचषक भारताच्या खात्यात येईल अशा सगळ्यांना त्याच्याकडून खूप आशा आहेत. मात्र आज होणाऱ्या सामन्यात रोहित शर्मा हा ख्रिस गेल (Rohit Sharma vs Chris Gayle ) चा रेकॉर्ड मोडणार की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (t20-world-cup 2022 hitman Rohit Sharma Records list)
आज रविवारी 30 ऑक्टोबरला भारताचा मुकाबला दक्षिण आफ्रिकासोबत (South Africa) होणार आहे. पर्थच्या मैदानावर हा सामना रंगणार आहे. टीम इंडियाने (team India) या पूर्वी पहिला विजय पाकिस्तावर मिळवला. त्यानंतर नेदरलँड्सवर (Netherlands) सलग दुसरा विजय मिळवून भारतीय टीमने वर्ल्ड कपमध्ये आपलं वचर्स्व गाजवलं आहे. आजचा सामना जिंकल्यास टीम इंडियाचं सेमीफायनल पक्क असणार आहे. दरम्यान, रोहितच्या नावावरही षटकारांचा मोठा विक्रम आहे.
रोहितच्या नावावर 495 षटकार
रोहित शर्मा (Rohit Sharma) फॉर्ममध्ये असताना तो प्रत्येक गोलंदाजावर षटकार ठोकू शकतो. त्याने आतापर्यंत कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 फॉरमॅटमध्ये एकूण 422 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने एकूण 495 षटकार मारले आहेत. आज (30 ऑक्टोबर) जर रोहितने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आणखी पाच षटकार मारले तर तो जागतिक क्रिकेटमध्ये 500 षटकार मारणारा जगातील दुसरा फलंदाज ठरेल. रोहितची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 41 शतके आहेत.
ख्रिस गेल अव्वल स्थानावर
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत वेस्ट इंडिजचा दिग्गज ख्रिस गेल (Chris Gayle) पहिल्या क्रमांकावर आहे. गेलच्या नावावर 483 सामन्यांमध्ये 553 षटकार आहेत. या कालावधीत त्याने 42 शतके आणि 105 अर्धशतके केली आहेत. रोहित शर्माने याच शैलीत खेळत राहिल्यास पुढील वर्षी तो गेलचा 'महारेकॉर्ड' मोडेल.दुसरीकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या इतर फलंदाजांबद्दल बोललो, तर ख्रिस गेल आणि रोहित शर्मानंतर शाहिद आफ्रिदी, मॅक्युलम आणि मार्टिन गप्टिल यांचा क्रमांक लागतो.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारे शीर्ष 5 फलंदाज
क्रिकेटर कंट्री सिक्स
1 ख्रिस गेल वेस्ट इंडिज 553
2 रोहित शर्मा भारत 495
3 शाहिद आफ्रिदी पाकिस्तान 476
4 ब्रेंडन मॅक्युलम न्यूझीलंड 398
5 मार्टिन गुप्टिल न्यूझीलंड 383
वाचा : Google वर 'या' गोष्टी सर्च करत असाल तर लगेच थांबा; नाहीतर होईल पश्चाताप
T20 विश्वचषकात भारताची अप्रतिम कामगिरी
भारतीय क्रिकेट संघाने टी-20 विश्वचषकात आतापर्यंत अप्रतिम कामगिरी केली आहे. त्याने आपले दोन्ही सामने जिंकले आहेत. रोहितच्या नेतृत्वाखालील संघाने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला हरवून विजयाने सुरुवात केली आणि नंतर नेदरलँड्सवर मात केली. आता त्याची नजर दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना जिंकण्यावर आहे. टीम इंडिया सध्या आपल्या गटात अव्वल स्थानावर आहे.