टी-20 विश्वचषकाआधीच भारत-पाक सामन्याचं स्कोरकार्ड व्हायरल
पाकिस्तानविरूद्धच्या महामुकाबल्यामध्ये पाहा कोण किती रन करणार, स्कोरकार्ड व्हायरल
Sport News : टी-20 विश्वचषकाच्या थराराला अवघे काही दिवस बाकी आहेत. 16 ऑक्टोंबरला विश्वचषकाचा पहिला सामना यजमान ऑस्ट्रेलिया आणि न्युझीलंडमध्ये होणार आहे. भारताचा पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानसोबत होणार आहे. भारतीय चाहते या हाय व्होल्टेज सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. (t20 world cup 2022 india pakistan fake scorecard of t20 world cup goes viral)
भारत आणि पाकिस्तानमध्ये (INDvsPAK t-20 Match World Cup) 23 ऑक्टोंबरला मेलबर्न (Melbourne) क्रिकेट मैदानावर सामना होणार आहे. या सामन्यामधील विजयी संघ उपांत्य फेरीत जाण्याची शक्यता आहे. मात्र त्याआधी या सामन्याचं स्कोरकार्ड (INDvsPAK t-20 Match Score Card Viral) सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. दोन स्कोरकार्ड असून त्यातील दोन्ही स्कोरकार्डमध्ये भारताने पाकिस्तान संघाला धूळ चारली आहे.
पहिल्या स्कोरकार्डनुसार नाणेफेक जिंकून पाकिस्तानने भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आहे. पहिल्यांदा फलंदाजी करताना विराट कोहलीने 58 चेंडूत 117 केल्या आहेत. भारताने एकूण 224 धावा केल्या असून पाकिस्तानला 225 धावांचं लक्ष्य दिलं होतं. मात्र पाकिस्तानचा संघ या आव्हानाचा पाठलाग करताना 171 धावा 8 विकेट्सवर आटोपला आहे. मोहम्मद रिझवानने 54 चेंडूत 75 धावा केल्या आहेत. भारताकडून दीपक चहरने 27 धावांत 4 तर शादाब खानने 2 विकेट्स घेतल्या आहेत. अखेर भारताने हा सामना 53 धावांनी जिंकला आहे.
दुसऱ्या स्कोरकार्डनुसार पाकिस्तानने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. भारताकडून विराट कोहलीही 39 चेंडूत 105 धावा करत आहे. या शतकाच्या जोरावर भारताने 1 विकेट गमावत 188 धावा केल्या आहेत. शाहीन आफ्रिदीने एक विकेट घेतली आहे. पाकिस्तानचा संघ अवघ्या 36 धावांवर आटोपला आहे. कर्णधार बाबर आझमने 9 धावा केल्या आहेत. अनुभवी भुवनेश्वर कुमारने 3 षटकात 6/9 घेतले आणि भारताने 152 धावांनी सामना जिंकला आहे.
सोशल मीडियावर हे दोन्ही स्कोरकार्ड व्हायरल झाले आहेत. सुरूवातील फिक्सिंग झालं की काय असं अनेकांना वाटलं होतं. मात्र एका भारताच्या चाहत्याने हे स्क्रीनशॉट पोस्ट केले आहेत.