T20 World Cup 2022 India vs Netherland: टी 20 वर्ल्डकपच्या सुपर 12 फेरीत पाकिस्तानला पराभूत करत भारतानं विजयी सलामी दिली आहे. या फेरीतील भारताचा दुसरा सामना नेदरलँडसोबत (India vs Netherland) आहे. नेदरलँडनं बांगलादेशसोबतचा पहिला सामना गमवला आहे. त्यामुळे भारताविरुद्ध चांगली कामगिरी करण्याच्या हेतून नेदरलँडचा संघ मैदानात उतरणार आहे. त्यामुळे हा सामना भारताला हलक्यात घेऊन चालणार नाही. या सामन्यासाठी कर्णधार रोहित शर्मा संघात काही बदल करण्याची शक्यता आहे. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात चांगली कामगिरी करणाऱ्या हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) या सामन्यात आराम दिला जाईल असं सांगण्यात येत आहे. मात्र भारतीय संघाचा गोलंदाज प्रशिक्षक पारस म्हांब्रेनं या सर्व अफवा असल्याचं सांगितलं आहे. हार्दिक पांड्या नेदरलँडविरुद्धच्या सामन्यात खेळेल असं त्यांनी सांगितलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"हार्दिक पांड्या अष्टपैलू खेळाडू आहे. त्याच्यामुळे संघात स्थिरता येते. हार्दिक चार षटकं टाकतो. त्याचबरोबर आक्रमक फलंदाजी देखील करतो. त्यामुळे त्याला बसवणं शक्यच नाही. पांड्या व्यवस्थित असून नेदरलँडविरुद्धच्या सामन्यात खेळेल", असं पारस म्हांब्रे यांनी सांगितलं.


T20 WC Aus vs SL: मिशेल स्टार्कची नॉन स्ट्रायकरला उभ्या असलेल्या धनंजय डिसिल्वाला वॉर्निंग, Photo Viral


दुसरीकडे अक्षर पटेल ऐवजी संघात ऋषभ पंतला (Rishabh Pant) संधी मिळण्याची शक्यता आहे. आर. अश्विन संघात असताना दुसऱ्या फिरकीपटूला आराम दिला जाऊ शकतो. आर. अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप या चार गोलंदाजांसह पाचवा गोलंदाज म्हणून हार्दीक पांड्या 4 षटकं टाकेल. त्यामुळे संघात ऋषभ पंत असेल असं सांगण्यात येत आहे. 


भारतीय प्लेईंग 11- केएल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, आर. अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग


नेदरलँड प्लेईंग 11- मॅक्स ओडॉउड, विक्रमजित सिंग, बॅस दी लीद, टॉम कूपर, कोलिन अकरमॅन, स्कॉट एडरवर्ड, टिम प्रिंगल, रोलोफ वॅन दर मर्वे, टिम वॅन दर गुगटेन, फ्रेड क्लासेन, पॉल वॅन मीकरेन