पर्थ : येत्या 16 ऑक्टोंबरपासून ऑस्ट्रेलियात (Australia) टी20 वर्ल्ड कपला (T20 World Cup)  सुरूवात होत आहे. या वर्ल्ड कपसाठी अनेक टीम्स ऑस्ट्रेलियात दाखल झाल्या आहेत. आज टीम इंडियाचा (Team India) सराव सामना देखील पार पडला. या सामन्यात टीम इंडियाने चांगलाच दमखम दाखवून वर्ल्ड कपसाठी सज्ज असल्याचे दाखवून दिले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाने (Team India) आज पर्थमध्ये वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia)  पहिला सराव सामना खेळला. या सामन्यात टीम इंडियाने वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचा 13 धावांनी पराभव केला. भारताकडून सूर्यकुमार यादव (Surykumar Yadav) आणि अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) यांनी चमकदार कामगिरी केली. या विजयासह ऑस्ट्रेलियात टीम इंडियाने विजयी सुरुवात केली.


रोहित शर्माने (Rohit Sharma) नाणेफेक जिंकून प्रथम बॅटींग करण्याचा निर्णय घेतला होता. टीम इंडियाने (Team India) प्रथम बॅटींग करत 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावत 158 धावा केल्या होत्या. 


या सामन्यात केएल राहुल आणि विराट कोहली सहभागी झाले नव्हते. त्यामुळे  रोहित शर्मा आणि ऋषभ पंत यांनी ओपनिंग केली होती. रोहितने 3 आणि पंतने 9 धावा केल्या. तर सूर्यकुमारने अवघ्या 35 चेंडूत 52 धावा केल्या. त्याचवेळी हार्दिक पांड्याने 20 चेंडूत 29 धावा केल्या. याशिवाय दीपक हुडाने 22 आणि दिनेश कार्तिकने 19 धावांचे योगदान दिले होते. 


या धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचा (Australia) संघ 8 विकेट गमावून फक्त 145 धावाचं करू शकला. त्यामुळे टीम इंडियाने वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचा (Australia) 13 धावांनी पराभव केला. यामध्ये टीम इंडियाकडून अर्शदीप सिंगने गोलंदाजीत कमाल केली. अर्शदीपने एकूण तीन विकेट घेतल्या. तर भुवनेश्वर कुमारला दोन यश मिळाले.


टीम इंडियाने (Team India)  सराव सामन्यात विजय मिळवल्याने संघाचा उत्साह वाढला आहे. त्यामुळे टीम इंडिया वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) चांगली कामगिरी करेल अशी क्रिकेट फॅन्सना उत्सुकता आहे.