IND vs ZIM T20 World Cup 2022, Axar Patel Poor Performance: भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) सध्या क्रिकेटच्या फॉरमेटमध्य़े उत्तम कामगिरी करत आहे. त्यामुळे संघातील खेळाडूही तितकीच अव्वल कामगिरी करणारे असायला हवेत. त्यामुळे एखादा खेळाडू सातत्याने निराशाजनक कामगिरी करत असल्यास त्याला संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात येतो. अशीच काहीशी परिस्थिती ओढावली आहे ती म्हणजे अष्टपैलू अक्षर पटेलवर (Axar Patel).  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय संघ आता 6 नोव्हेंबरला म्हणजेच रविवारी झिम्बाब्वेशी (Ind vs Zim ) भिडणार आहे.  T20 विश्वचषकाच्या सुपर-12 फेरीतील हा गट-2 सामना मेलबर्न क्रिकेट मैदानावर (MCG) खेळवला जाईल. मेलबर्नच्या (Melbourne) या मैदानावर भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव केला. दरम्यान रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणारी टीम इंडिया सध्याच्या T20 विश्वचषक (T20 World Cup-2022) मध्ये चांगली कामगिरी करत आहे. या संघाने सुपर-12 फेरीतील चारपैकी तीन सामने जिंकले असून आता उपांत्य फेरीतील स्थानाकडे डोळे लागले आहेत. भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान, नेदरलँड आणि बांगलादेश यांचा पराभव केला तर एकमेव पराभव दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झाला.  


वाचा : झिम्बाब्वेला हलक्यात घेऊ नका; Team India मोठ्या फरकाने सामना जिंकली नाही, तर...  


टी-20 विश्वचषकात सध्याच्या घडीला सर्वात जास्त चर्चा आहे ती भारत आणि झिम्बाब्वे यांच्या सामन्याची. कारण हाच सामना भारत आणि पाकिस्तानचा संघ सेमी फायनलमध्यो पोहोचणार की नाही, हे ठरवणार आहे. दक्षिण आफ्रिका ५ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. असे असताना सर्वांच्या नजरा अष्टपैलू अक्षर पटेलवर (Axar Patel) आहेत. 


अक्षर पटेलची निराशाजनक कामगिरी


दरम्यान, सर्वांच्या नजरा अष्टपैलू अक्षर पटेलवर (Axar Patel) आहेतय. या जागतिक स्पर्धेत कर्णधार रोहित शर्माने (Rohit sharma) वारंवार संधी दिली. 28 वर्षीय अक्षर हा मूळचा गुजरातचा असून टी-20 विश्वचषक-2022 मधील केवळ एका सामन्यातून त्याला वगळण्यात आले. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात रोहितने दीपक हुडाला संधी दिली पण बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात पुन्हा पत्र परतले. अक्षर मात्र टी-20 विश्वचषकात अद्याप स्वत:ची छाप पाडू शकलेला नाही.


वाचा : Team India कडून विराटला खास Birthday Surprise ; मेलबर्नमधील Celebration पाहातच राहाल 


3 सामन्यात फक्त 2 विकेट


सध्याच्या टी-20 विश्वचषकात अक्षरला आतापर्यंत फक्त दोनच विकेट्स मिळाल्या आहेत. त्याने पाकिस्तानविरुद्ध 21 धावा दिल्या आणि त्याला एकही विकेट मिळाली नाही. त्यानंतर नेदरलँडविरुद्धच्या सामन्यात 18 धावांत 2 बळी घेतले. त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातून वगळण्यात आले होते. त्यानंतर अॅडलेडमध्ये बांगलादेशविरुद्धही त्याचे खाते उघडले नाही आणि त्याला एकही विकेट मिळवता आली नाही. त्याच्या एकूण क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, अक्षरने आतापर्यंत 35 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत ज्यात 33 बळी घेतले आहेत. त्याने कसोटीत 39 आणि एकदिवसीय सामन्यात 53 बळी घेतले आहेत.


 अक्षर पटेलला संधी मिळाली नाही, तर...


6 नोव्हेंबरला झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात अक्षर पटेलला संधी मिळाली नाही, तर त्याच्या अडचणी आणखी वाढू शकतात हे उघड आहे. वास्तविक, भारताने उपांत्य फेरी गाठली तर रोहित कोणत्याही प्रकारचा प्रयोग टाळेल. त्याचबरोबर झिम्बाब्वेचा पराभव झाला तर संघातील प्रत्येक खेळाडूची कामगिरी 'एक्स-रे' होईल. अशा स्थितीत अक्षरची अलीकडची कामगिरी पाहता त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होणे साहजिकच आहे.