अडचणी काही संपेना; वर्ल्ड कपपूर्वी अजून 2 फलंदाज दुखापतग्रस्त
क्रिकेट टीमचं दुखापतीचं ग्रहण काही संपेना, अजून 2 खेळाडू दुखापतीमुळे वर्ल्डकपबाहेर होण्याची शक्यता!
Sport News : येत्या 16 ऑक्टोंबरपासून टी-20 वर्ल्ड कपच्या थराराला सुरूवात होणार आहे. मात्र टी-20 वर्ल्ड कपआधी खेळाडूंना दुखापतींचं ग्रहण लागलं आहे. भारताचा हुकमी एक्का जसप्रीत बुमराह आणि ऑल राऊंडर रविंद्र जाडेजा दुखापतीमुळे वर्ल्ड कपला मुकणार आहे. आता आणखी दोन तगडे फलंदाज दुखपतग्रस्त झाले आहेत. (T20 World Cup 2022 Lockie Ferguson & Daryl Mitchell injured may out Tri Series from Sports Marathi News)
न्यूझीलंड संघाला दुखापतीचा फटका बसण्याची शक्यता आहे. पाकिस्तान आणि बांगलादेशविरुद्ध तिरंगी मालिका खेळणाऱ्या किवी संघाचे दोन मोठे खेळाडू दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडले आहेत. डॅरिल मिशेलनंतर आता लॉकी फर्ग्युसनही आगामी सामन्यांमध्ये खेळताना दिसणार नाही. विश्वचषक पाहता हे दोन्ही खेळाडू विश्वचषक संघाचा भाग असल्याने संघासाठी ही चिंतेची बाब ठरू शकते.
न्यूझीलंडचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टेड म्हणाले, लॉकी फर्ग्युसनला सध्या सौम्य दुखापत आहे. विश्वचषकाबाबत तो आमच्या संघाचा महत्त्वाचा भाग आहे, त्यामुळे आम्ही त्याची विशेष काळजी घेत आहोत. दुखापतीमुळे तो गेल्या वर्षी टी-20 विश्वचषकातही खेळला नव्हता. दुखापतीतून सावरण्यासाठी त्याला काही दिवस लागतील, त्यामुळे तो तिरंगी मालिकेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे.
डॅरिल मिशेल अलीकडेच बोटाच्या दुखापतीमुळे तिरंगी मालिकेतून बाहेर झाला आहे. लॉकी फर्ग्युसनलाही तंदुरुस्तीमुळे संघाबाहेर ठेवण्यात आले आहे जेणे करून तो विश्वचषकात पूर्णपणे तंदुरुस्त राहू शकेल अशी अपेक्षा आहे. न्यूझीलंड 22 ऑक्टोबर रोजी सिडनी येथे यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्ध T20 विश्वचषकातील पहिला सामना होणार आहे.