PAK vs NZ 1st Semi-Final T20 World Cup 2022 : ऑस्ट्रेलियात (Australia) सुरु असलेली टी20 वर्ल्ड कप स्पर्धा आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. बुधवार आणि गुरुवारी सेमीफायनची चुरस रंगणार आहे. बुधवारी पहिला सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंडदरम्यान (New Zealand vs Pakistan) रंगणार आहे. तर गुरुवारी भारताचा सामना इंग्लंडशी (India vs England) रंगणार आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तान आणि न्यूझीलंड (New Zealand vs Pakistan) यांच्यातील पहिला सामना हा बुधवारी 9 नोव्हेंबरला सिडनीच्या मैदानात खेळवण्या येणार आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यासाठी पंच सिडनीच्या मैदानात दुपारी 12 वाजता उतरतील. सिडनीला जर पाऊस पडत असेल तर पंच मैदानाचा अंदाज घेतील.


पावसामुळे किती वेळ वाया गेला आहे आणि किती षटकांचा खेळ खेळवायचा, या निर्णय पंच घेतील आणि दोन्ही कर्णधारांना सांगतील. पण मैदान पूर्णपणे सुकल्याशिवाय. हा सामना खेळवला जाणार नाही. जर पाऊस पडला नाही. तर पंच मैदानात 12.30 वाजता उतरतील आणि मैदानाची पुन्हा पाहणी करतील. 


वाचा : पेट्रोल आज स्वस्त झाले की महाग? जाणून घ्या तुमच्या शहरातील दर


त्यानंतर पाकिस्तान आणि न्यूझीलंड (New Zealand vs Pakistan)  या दोन्ही संघांचे कर्णधार हे टॉससाठी मैदानात दुपारी 1 वाजता उतरली. टॉस झाल्यावर जो कर्णधार जिंकला आहे तो आपला निर्णय जाहीर करेल. त्यानंतर पाकिस्तान आणि न्यूझीलंडचे दोन्ही कर्णधार आपला या सामन्यासाठीचा संघ जाहीर करतील. 


न्यूझीलंज आणि पाकिस्तान (New Zealand vs Pakistan) यांच्यामध्ये चांगलाच चुरशीचा सामना होईल. कारण दोन्ही संघांमध्ये चांगले गोलंदाज आहेत.त्यामुळे या सामन्यात या गोलंदाजांचा सामना फलंदाज कसे करतात, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. हा सामना जो जिंकेल तो थेट अंतिम फेरीत पोहोचणार आहे. 


संघ खालीलप्रमाणे आहेत.
न्यूझीलंड: केन विल्यमसन (क), मार्टिन गप्टिल, फिन ऍलन (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मायकेल ब्रेसवेल, मिचेल सँटनर, अॅडम मिल्ने, ईश सोधी, लॉकी फर्ग्युसन, टिम साउथी, डेव्हॉन कॉनवे, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम , ट्रेंट बोल्ट.


पाकिस्तान: बाबर आझम (कर्णधार), आसिफ अली, हैदर अली, खुशदिल शाह, शान मसूद, मोहम्मद हारिस, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम जूनियर, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), हरिस रौफ, मोहम्मद हसनैन, नसीम शाह शाहीन आफ्रिदी.