Ind vs Pak : पाकिस्तान अजून किती रडणार! आता म्हणतात, रोहित शर्माने टॉसवेळी जाणूनबुजून....
`रोहित शर्माने जाणूनबुजून टॉसवेळी...`, माजी खेळाडूने केला धक्कादायक आरोप!
Sport News : भारताकडून झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानचे माजी खेळाडू काहीही बोलत सुटल्याचं दिसत आहे. पाकिस्तानला हा पराभव पचनी पडत नसून चांगलाच जिव्हारी लागला आहे. पराभवाचा पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंच्या मनावर इतका परिणाम झाला आहे की ते आता टीम इंडिया आणि त्याच्या खेळाडूंवर नवनवीन आरोप करून आपला राग व्यक्त करत आहेत. भारतीय कर्णधार रोहित शर्माने टॉसवेळी मोठा झोल केल्याचा आरोप पाकिस्तानचे माजी खेळाडू आकिब जावेद यांनी केला आहे.
काय केलाय आरोप
रोहित शर्माने टॉस असा उडवला की जसा काय तो टॉसचा कॉइन बराच लांब फेकला. ज्या ठिकाणी टॉस पडला त्या ठिकाणी फक्त तो मॅच रेफरीने जाऊन पाहिला हेड आहे की टेल. कर्णधार टॉससाठी स्वत: जातात कारण हे पाहण्यासाठी की हेड आहे की टेल? मात्र भारत-पाक सामन्यावेळी फक्त मॅच रेफरीनेच जाऊन पाहिलं की टॉस काय आहे त्यानंतर रोहितला सांगितलं की हेड आहे. ही गोष्ट धक्कादायक असल्याचं आकिब जावेद यांनी म्हटलं आहे.
एकंदरित आकिब जावेद यांचं म्हणणं की, रोहितने जाणूनबुजून टॉसवेळी कॉइन लांब फेकला आणि त्यानंतर तो फक्त मॅच रेफरीनेच पाहिला. आता मात्र हद्दच झाली आहे कारण सामना हरल्यावर नो बॉलवरून पाकिस्तानच्या माजी खेळाडूंनी अनेक आरोप केले होते. पुन्हा एकदा, टॉसवेळी असा झोल केला हा नवीन आरोप करत पाकिस्तान स्वत: चं हसू करून घेत आहे.
पाकिस्तानचे माजी खेळाडू किती दिवस अशा प्रकारे आरोप करणार आहेत माहित नाही. एक मात्र नक्की आहे त्यांना या पराभवामुळे चांगल्याच मिरच्या झोंबल्या आहेत. आता पाकिस्तान संघ दुसऱ्या सामन्यामध्ये कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. पराभवामुळे पाकिस्तान संघाच्या खेळाडूंचं मनोबल हे कमी झालं यात काही शंका नाही.