T20 World Cup 2022 : पाकचं सेमीफायनलचं तिकीट पक्कं? काय समीकरणं आहेत जाणून घ्या
South Africa vs Pakistan : पाकिस्तानचं सेमीफायनलचं तिकीट (T20 Wc 2022 Semifinal) हुकलं असं म्हटलं जातं आहे. पण थांबा थांबा...पाकिस्तानसाठी अजूनही सेमीफायनलचे रस्ते उघडे आहेत. ते कसं शक्य आहे आपण जाणून घेऊयात...
T20 Wc 2022 Pakistan Semifinal : टी20 वर्ल्डकपमध्ये (T20 World Cup) आतापर्यंत अनेक देशांमध्ये मॅच झाल्या आहेत. बुधवारी भारताने (Team India) बांगलादेशला (Bangladesh) हरवून टी20 वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये आपली जागा जवळपास निश्चित केली आहे. तिकडे पाकिस्तानही सेमीफायनलमध्ये येण्यासाठी लढतं आहे. पाकिस्तान (Pakistan) आज गुरुवारी (03 नोव्हेंबर 2022) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) लढणार आहे. पाकिस्तानसाठी आजची मॅच खूप महत्त्वाची आहे. टी20 वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानचा पहिला सामना भारताशी झाला त्यात भारताने पाकचा दारुण पराभव केला. त्यानंतर झिम्बाब्वेसुद्धा (Zimbabwe) पाकचा धुव्वा उडवला. या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी पाकिस्ताने नेदरलँड्सवर (Netherlands) विजय मिळवला.पाक आतापर्यंत 3 मॅच खेळा त्यापैकी फक्त एका मॅचमध्ये त्याने विजयी कामगिरी केली आहे. त्यामुळे पाकिस्तानचं सेमीफायनलचं तिकीट (T20 Wc 2022 Semifinal) हुकलं असं म्हटलं जातं आहे. पण थांबा थांबा...पाकिस्तानसाठी अजूनही सेमीफायनलचे रस्ते उघडे आहेत. ते कसं शक्य आहे आपण जाणून घेऊयात...
सेमीफायनलचं गणित
ग्रुप - 2 मधील पाकिस्तान अजूनही सेमीफायनलमध्ये खेळू शकते. पॉइंट्स टेबलमध्ये पाकिस्तान 3 मॅचपैकी 1 मॅच जिंकली आहे. आजची मॅच पाकिस्तानसाठी खूप गरजेची आहे. दक्षिण आफ्रिकेवर (South Africa) पाकिस्तानला विजय मिळवणे खूप गरजेचं आहे. त्याशिवाय बांग्लादेशलाही पाकला धुर चारणं गरजेचं आहे. एकून 5 मॅचपैकी जर 3 मॅच जिंकल्यावर पाकिस्तान पॉइंट्स टेबलमध्ये 6 गुण मिळतील. तर तिकडे झिम्बाब्वेनं भारतावर विजय मिळवला तर पाकिस्तानचा सेमी फायनलचा रस्ता मोकळा होतो. (T20 World Cup 2022 Pakistan Semifinal and South Africa vs Pakistan 2022 nmp)
सेमीफायनलसाठी असंही गणित
इतर देशांबद्दल बोलायचं झालं तर दक्षिण आफ्रिका पुढील दोन मॅच हरायला पाहिजे. तरच पाकिस्तान नेट रन रेटचा भानगडीत न पडता थेट सेमीफायनल गाठू शकतं. दक्षिण आफ्रिकेला त्यांच्या शेवटच्या सामन्यात नेदरलँड्सचा पराभव करावा लागेल, ज्यामुळे गुणतालिकेत आफ्रिकन संघाच्या खात्यात एकूण 7 गुण होतील. त्यामुळे उर्वरित दोन सामने जिंकूनही पाकिस्तानचे सहा गुण कमी होतील. असं झालं तर भारत आणि दक्षिण आफ्रिका हे गट 2 मधून उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणारे दोन संघ असतील.