T20 World Cup 2022: भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यासाठी अशी असेल प्लेईंग इलेव्हन
India vs Pakistan : भारत-पाकिस्तान सामन्याची उत्सूकता वाढली आहे.
T20 World Cup 2022: T20 World Cup सुरु झाला आहे. 23 ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) सामना रंगणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची एक लाख तिकिटे विकली गेली आहेत. जगभरातील चाहत्यांमध्ये नेहमीच या सामन्याची उत्सूकता असते. स्पर्धेतील पहिलाच सामना भारत-पाकिस्तानचा असल्याने दोन्ही संघांवर दडपण असणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन काय असू शकते. जाणून घेऊया.
सामन्यावर पावसाचं सावट
विश्वचषकाच्या साखळी टप्प्यातील सामन्यांसाठी कोणताही राखीव दिवस नाही. जर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पावसामुळे झाला नाही तर दोघांना 1-1 गुण दिला जावू शकतो.
भारत विरुद्ध पाकिस्तान, T20 विश्वचषक 2022, सुपर-12 सामना
वेळ आणि तारीख: रविवार (२३ ऑक्टोबर) दुपारी १:३० वाजता.
मैदान: मेलबर्न क्रिकेट ग्राउंड.
प्लेइंग इलेव्हन काय असू शकते?
भारत: रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, हर्षल पटेल, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार.
पाकिस्तानः बाबर आझम, मोहम्मद रिझवान, शान मसूद, हैदर अली, इफ्तिखार अहमद, आसिफ अली, शादाब खान, मोहम्मद नवाज, नसीम शाह, हरिस रौफ आणि शाहीन शाह आफ्रिदी.