Suryakumar Yadav इतर खेळाडूंवर दबाव...; SKY विषयी Rohit Sharma चं मोठं विधान
या विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav). सूर्याच्या आजच्या खेळीवर कर्णधार रोहित शर्मा देखील फार खुश होता.
Rohit Sharma on Suryakumar Yadav : मेलबर्नच्या क्रिकेट ग्राऊंडवर आज टीम इंडियाने (Team India) झिम्बावेचा पराभव केला. 71 रन्सने रोहित सेनेने (Rohit Sharma) झिम्बाब्वेचा सुपडा साफ केला. या विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav). सूर्याच्या आजच्या खेळीवर कर्णधार रोहित शर्मा देखील फार खुश होता. सामन्यानंतर सूर्याचं रोहितने तोंडभरून कौतुक केलं आहे.
काय म्हणाला रोहित शर्मा?
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा सामन्यानंतर म्हणाला, 'जेव्हा सूर्या फलंदाजी करतो तेव्हा मी डगआउटमध्ये आरामात राहू शकतो. मुख्य म्हणजे सूर्यकुमार फलंदाजी करताना फार संयमाने खेळतो.'' आजच्या सामन्यात सूर्यकुमारने 25 चेंडूत 61 रन्सची खेळी खेळली. त्याच्याशिवाय केएल राहुलनेही तुफानी अर्धशतक झळकावलं.
रोहित शर्मा पुढे म्हणतो, सूर्यकुमार यादव टीम इंडियासाठी जे करतोय ते विलक्षण आहे. तो क्रीजवर येताच त्याचा नैसर्गिक खेळ खेळण्यास सुरुवात करतो. मुख्य म्हणजे तो क्रिजवर आला की इतर खेळाडूंवरचा दबाव कमी करतो. त्याच्यामध्ये काय क्षमता आहे याची आम्हाला चांगली जाणीव झालीये. त्याच्यासोबत क्रिझवर असताना दुसऱ्या टोकाचा फलंदाज अगदी आरामात खेळू शकतो. इतकंच नाही तर त्याने स्वबळावर सामने जिंकले आहेत."
टीम इंडियाचा विजय
टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाची (Team India) सुरूवात चांगली झाली. मात्र, कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) लवकर बाद झाला. विराट आणि रोहितने जबाबदारीने खेळत झिम्बाब्वेचं रान उठवलं. जोरदार फटकेबाजी करत राहूलने अर्धशतक साजरं केलं. तर त्यानंतर आलेल्या सुर्यकुमारने (Suryakumar) देखील धमाकेदार अंदाजात 25 चेंडूत 61 धावा केल्या. यावेळी त्यानं 6 चौकार तर 4 षटकार खेचले.
टीम इंडियाने दिलेल्या 187 धावांचा पाठलाग करताना झिम्बाब्वेची सुरूवात चांगली झाली नाही. सलामीवीर वेसली माधवेरे पहिल्याच बॉलवर बाद झाला. तर रेजिस चकाबवा याला देखील भोपळा फोडता आला नाही. कालांतराने झिम्बाब्वेची फलंदाजी ढासळत गेली. अखेरच्या 4 षटकात झिम्बाब्वेला 80 धावांची गरज होती. मात्र, अखेर झिम्बाब्वेचा 71 धावांनी पराभव झाला आहे.