Rohit Sharma On Indian Batting, IND vs NED T20 World Cup 2022: टी 20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताची विजयी घोडदौड सुरुच आहे. पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर नेदरलँडला पराभवाची (India vs Netherland) धूळ चारली आहे. नेदरलँडविरुद्धचा सामना भारताने 56 धावांनी जिंकला. विजयानंतर भारतीय संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी विराजमान झाला आहे. नेदरलँड विरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यांनी अर्धशतकं झळकावली. 20 षटकात 2 गडी गमवून 179 धावा केल्या आणि विजयासाठी 180 धावांचं आव्हान ठेवलं. मात्र नेदरलँडचा संघा 20 षटकात 9 गडी गमवून 123 धावा करू शकला. या सामन्यात सामनावीर म्हणून सूर्यकुमार यादवला गौरविण्यात आलं. असं असलं तरी भारतीय कर्णधार रोहित शर्मानं फलंदाजीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. सामन्यानंतर विजयाबाबत विचारलं असता कर्णधार रोहित शर्मानं आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"जेव्हा जिंकण्याची अपेक्षा असते तेव्हा खूप दबाव असतो. आमच्यासाठी प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे. फलंदाजीला आलो तेव्हा आमची सुरुवात अडखळत झाली. आम्ही सुरुवातीच्या षटकात चांगल्या धावा करू शकतो नाही. त्यामुळे मी फलंदाजीवर तसा खूश नाही. ही एक परिपूर्ण खेळी होती असं मी म्हणणार नाही. चांगल्या धावा कराव्या लागतील. त्या तुम्ही कशा करता याने काहीच फरक पडत नाही. आत्मविश्वास टिकवून ठेवणे महत्त्वाचे आहे.", असं कर्णधार रोहित शर्मानं सांगितलं. दुसरीकडे केएल राहुल नेदरलँडविरुध्दच्या सामन्यात अपयशी ठरला. केएल राहुल अवघ्या 9 धावा करून तंबूत परतला. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातही केएल राहुलची बॅट चालली नव्हती.


Ind vs Pak: 'शेवटचा चेंडू माझ्या पॅडला लागला असता तर मी...', आर. अश्विननं स्पष्टच सांगितलं


गुणतालिकेत भारत 4 गुणांसह अव्वल स्थानी आहे. मात्र धावगती हवी तशी नसल्याने एखाद्या पराभवामुळे उपांत्य फेरीचं गणित बिघडू शकतं. त्यात पावसानं दिग्गज संघांचं गणित आधीच बिघडून ठेवलं आहे. त्यामुळे पुढच्या काही सामन्यात पाऊस रुसला तर गुण सारखे असले तर धावगतीच महत्त्वाची ठरणार आहे.