T20 Wrold Cup 2022, Semifinals : भारतीय क्रिकेट संघाने टी20 वर्ल्ड (World Cup)) कपमध्ये विजयी सुरुवात केली. पण, रविवारी खेळवल्या गेलेल्या सामन्यात संघाचा विजयरथ दक्षिण आफ्रिकेच्या संघानं रोखला. 5 विकेट्सनं दक्षिण आफ्रिका संघानं (South Africa) भारतावर मात केली. आकडेवारी किंवा संघाची कामगिरी पाहता या पराभवाचा संघावर फारसा परिणाम होणार नाही. कारण, सुरुवातीचे दोन सामने Team India जिंकली आहे. पण, पावसानं जर कपटी खेळी केली, तर मात्र भारतीय संघाचा गोंधळ उडू शकतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

.... आणि पाऊस आल्यास काय होणार? 
येत्या काही दिवसांमध्ये ऑस्ट्रेलियात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळं दोन्ही सामन्यांच्या वेळी पावसानं धुमाकूळ घातल्यास भारतीय संघाचे गुण 6 असतील. अशा परिस्थितीत पाकिस्तान, झिम्बाब्वे किंवा बांगलादेशची वर्षी उपांत्य फेरीत लागणार आहे. त्यामुळे आता टीम इंडिया या मैदानावरील विरोधकांना नमवणार की, अस्मानी खलनायक त्याचा डाव साधणार यावर सर्वांचं लक्ष असेल. (Rail Alert during t20 world cup)


आता नजरा बांगलादेशवर...
भारतीय संघाला सुपर 12 फेरीमध्ये अखेरचे दोन सामने झिम्बाब्वे आणि बांगलादेश (Bangladesh) या संघांविरोधात खेळाचे आहेत. या सामन्यांमध्ये संघ बांगलादेशकडून पराभूत होतो तर, Team India चे एकूण 6 गुण असतील आणि बांगलादेशची गुणसंख्याही तितकीच असेल. पण, जर बांगलादेश पाकिस्तानचा पराभव करण्यात यशस्वी ठरतोय तर 8 गुणांसह तो भारताच्या पुढे असेल. थोडक्यात हा संघ उपांत्य फेरीत थेट मजल मारेल. थोडक्यात भारत बांगलादेशकडून पराभूत झाला तर, पाकिस्तान (Pakistan) किंवा बांगलादेश या दोघांपैकी एक देश उपांत्य फेरीत प्रवेश करेल. 


आणखी एक शक्यता कोणती? 
भारतीय संघ बांगलादेशविरोधात जिंकला, पण जर झिम्बाब्वेविरोधात पराभूत झाला, तर झिम्बाब्वेचे दक्षिण आफ्रिकेसोबत उपांत्य फेरीत जाण्याची शक्यता वाढेल. पण, यासाठी झिम्बाब्वेला नेदरलँडलाही पराभवाचा चेहरा दाखवावा लागणार आहे. असं केल्यास या संघाची गुणसंख्या 7 असेल आणि भारताची 6. 


भारतीय संघाची एकंदर कामगिरी आतापर्यंत समाधानकारक आहे. पण, संघातील काही खेळाडू मात्र सातत्यानं चांगलं प्रदर्शन करण्यात अपयशी ठरत आहेत. त्यातलंच एक नाव म्हणजे, KL Rahul. संघाकडून फलंदाजीची सुरुवात करण्यासाठी येणारा राहल अद्यापही टी20 वर्ल्ड कपमध्ये अपेक्षित कामगिरी करु शकलेला नाही. मु्ख्य म्हणजे त्याच्या कामगिरीवर एक नजर टाकली असता त्याला पर्यायी खेळाडू संघात असल्यास त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये (Playing 11) स्थान द्यावं, अशीच मागणी क्रीडारसिकांकडून करण्यात येणार आहे. तेव्हा आता राहुल आपला फॉर्म सुधारत संघाला सहजपणे उपांत्य फेरीत पोहोचवण्यात मदत करतो की निवड समितीला कठोर निर्णय घेण्यास भाग पाडतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.