T20 World Cup Sri Lanka Vs Namibia: टी 20 वर्ल्डकपच्या ग्रुप स्टेज ए मधील पहिल्याच सामन्यात श्रीलंकेला नामिबियाकडून (Sri Lanka Vs Namibia) पराभवाचा सामना करावा लागला. नामिबियानं श्रीलंकेला मोठ्या फरकाने पराभूत केल्यानं गुणतालिकेत मोठा उलटफेर झाला आहे. ग्रुप स्टेज ए मध्ये नामिबिया (Namibia), नेदरलँड (Netherlan), यूएई (UAE) आणि श्रीलंका (Sri Lanka) संघ आहे. प्रत्येक संघ तीन सामने खेळणार आहे.  या गटातून टॉ दोन संघांची सुपर 12 फेरीत निवड होणार आहे. या गटातून श्रीलंका प्रबल दावेदार मानला जात होता. पंरतु पहिल्याच सामन्यात दुबळ्या नामिबियानं श्रीलंकेचा 55 धावांनी पराभव केला. तसेच विजयी धावांचा पाठलाग करताना संपूर्ण संघ बाद झाल्याने नेट रनरेटवर परिणाम झाला आहे. त्यामुळे उर्वरित दोन सामने श्रीलंकेला मोठ्या फरकाने जिंकावे लागणार आहे. तसेच इतर संघाच्या कामगिरीवर पुढील वाटचाल निश्चित होणार आहे. दुसरीकडे बलाढ्य श्रीलंकेला पराभूत केल्यानं नामिबियाचा आत्मविश्वास दुणावला आहे. श्रीलंकेचा पुढील सामने नेदरलँड आणि यूएईसोबत असणार आहे.


टी 20 वर्ल्डकप 2022 (ग्रुप स्टेज)
संघ सामना विजय पराभव नेट रनरेट गुण
नामिबिया 1 1 0 +2.750 2
नेदरलँड 1 1 0 +0.097 2
यूएई 1 0 1 -0.097 0
श्रीलंका 1 0 1 -2.750 0

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आशिया कप विजेत्या श्रीलंकन संघाला नामिबियानं (Sri Lanka Vs Namibia) पराभूत केलं. श्रीलंकन संघानं नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय चुकीचा ठरला असंच म्हणावं लागेल. नामिबियानं प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 7 गडी गमवून 163 धावा केल्या आणि विजयासाठी 164 धावांचं आव्हान दिलं. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकन संघाचा डाव कोसळला. श्रीलंकेनं 19 षटकात सर्व गडी बाद फक्त 108 धावा केल्या. 55 धावांनी श्रीलंकेला पराभव सहन करावा लागल्याने क्रीडाप्रेमींनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. आता 18 ऑक्टोबरला श्रीलंकेचा दुसरा सामना यूएईसोबत असणार आहे. त्यानंतर 20 ऑक्टोबरला नेदरलँडसोबत सामना होणार आहे. 


T20 WC NAM Vs SL: नामिबियानं श्रीलंकेला पराभूत करताच सोशल मीडियावर 'हास्यजत्रा', नेटकऱ्यांकडून मीम्सचा वर्षाव


श्रीलंकन संघ- पथुम निस्सांका, कुसल मेंडिस, धनंजय डिसिल्वा, दानुश्का गुनाथिलाका, भानुका राजपक्षा, दासुन शनाका (कर्णधार), वनिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, प्रमोद मदुशन, दुशमंथा चमिरा, महीश थीकशाना