मुंबई : टी 20 वर्ल्ड कपमध्ये यंदा 16 टीम सहभागी होणार आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये टी 20 वर्ल्ड कपचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये 14 टीमने आधीच स्थान मिळवलं आहे. आता दोन नव्या टीमची या लिस्टमध्ये एन्ट्री झाली आहे. नेदलँड आणि झिम्बाब्वे या लिस्टमध्ये समाविष्ट झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झिम्बाब्वे येथे खेळल्या जात असलेल्या या क्वालिफायर स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीत यजमानांनी पापुआ न्यू गिनीचा 27 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेने 20 षटकांत पाच गडी गमावून 199 धावा केल्या. प्रत्युत्तरात पापुआ न्यू गिनी टीम 8 विकेट्सवर केवळ 172 धावाच करू शकली.


नेदरलँडने संयुक्त राज्य अमेरिकेचा 7 विकेट्सने पराभव करून आपलं स्थान निश्चित केलं. विरुद्ध टीमने 138 धावांचं टार्गेट दिलं. नेदरलँडने एक ओव्हर बाकी ठेवून टार्गेट पूर्ण केलं. आता टी 20 वर्ल्ड कपमध्ये 16 टीम पोहोचल्या आहेत. 


सुपर 12- ऑस्ट्रेलिया, भारत, इंग्लंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रीका, बांग्लादेश, अफगानिस्तान आणि न्यूजीलँड.
राउंड-1- वेस्टइंडीज, श्रीलंका, स्कॉटलँड, नामीबिया, आयर्लंड, संयुक्त अरब अमीरात, झिम्बाब्वे, नेदरलँड.


टी20 वर्ल्ड कप 2022 मध्ये सुपर-12 विरुद्ध राउंड-1 असा सामना होणार आहे. या आठ टीममध्ये दोन ग्रूप करण्यात येणार आहेत. टप्प्यातून पहिली फेरी-1 सामना होणार आहे. पहिल्या फेरीत एकूण आठ जण सहभागी होत आहेत. 


या आठ संघांची दोन गटात विभागणी करण्यात येणार आहे. दोन्ही गटातील टॉप-2 संघ सुपर-12 टप्प्यासाठी पात्र ठरतील. T20 विश्वचषक 2022 16 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. भारताचा पहिला सामना 23 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध होणार आहे.