Team india qualify semi final: आज रंगलेल्या सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशचा पराभव केलाय. पावसाचा व्यत्यत आल्यामुळे टीम इंडियाचा पराभव निश्चित मानला जात होता. मात्र पाऊस थांबल्यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी कमाल करत सामना फिरवला. या सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशचा 5 रन्सने पराभव केला. टीम इंडियाचा हा वर्ल्डकपच्या स्पर्धेतील तिसरा विजय होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अखेर या सामन्यात टीम इंडियाने बाजी मारली. या सामन्यामध्ये पावसाने व्यत्यत आणला होता. बांगलादेशला 185 रन्सचं आव्हान देण्यात आलं होतं. मात्र पाऊस आल्याने हे टार्गेट कमी करून 151 इतकंच करण्यात आलं. त्यामुळे पावसानंतर खेळ सुरु झाला त्यावेळी बांगलादेशला 54 बॉल्समध्ये 85 रन्स करण्याचं आव्हान दिलं होतं. 


बांगलादेशने (Bangladesh) टॉस जिंकत प्रथम  फिल्डिंगचा निर्णय घेतला होता. त्यामुळे टीम इंडिया (Team India) प्रथम फलंदाजीला उतरली होती. मात्र टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा 2 धावावर बाद झाला. तर के एल राहूलची बॅट बांगलादेश विरूद्ध काहीशी तळपली आहे. त्याने 32 बॉल मध्ये 50 धावा ठोकल्या. या खेळीत त्याने 4 सिक्स आणि 3 फोर मारले आहेत.  


त्यानंतर सुर्यकुमार मैदानावर आला मात्र त्यालाही 30 रन्सचं करता आले. हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक आणि अक्षर पटेल एकेरी धावसंख्या करून बाद झाले आहे. अश्विन 13 धावा करून नाबाद राहिला.  


टीम इंडियाकडून विराट कोहलीने (Virat Kohli) एकाकी झुंज दिली आहे. विराटने 44 बॉलमध्ये 64 धावा केल्या आहेत. या खेळीत त्याने 8 फोर आणि 1 सिक्स मारली. या एकाकी खेळीच्या बळावर टीम इंडियाने 6 विकेट गमावून 184 धावा केल्या आहेत. त्यामुळे आता बांगलादेशसमोर 185 धावांचं आव्हान होतं.