T20 World Cup Sri Lanka vs UAE: टी 20 वर्ल्डकप स्पर्धेच्या ग्रुप स्टेजमधील सामन्यात श्रीलंका आणि यूएई (Sri Lanka Vs UAE) यांच्यात सामना सुरु आहे. यूएईने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेनं 20 षटकात 8 गडी गमवून 152 धावा केल्या आणि विजयासाठी 153 धावांचं आव्हान दिलं. यूएईच्या पलानिपन मेयप्पननं या स्पर्धेतील पहिली हॅटट्रीक (Palaniapan Meiyappan Took First Hattrick) घेतली. पलानिपन मेयप्पननं 4 षटकात 19 धावा देत 3 गडी बाद केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यूएईच्या कर्णधारानं 14 वं षटक पलानिपन मेयप्पनकडे सोपवलं. या षटकाच्या पहिल्या चेंडूवर निस्सांका समोरा गेला. त्याने या चेंडूवर 2 धावा घेतल्या. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर 1 धाव आली. स्ट्राईकला आलेल्या भानुका राजापक्षाला मेयप्पननं तिसऱ्या चेंडू टाकला आणि निर्धाव गेला. त्यानंतर चौथ्या चेंडूवर राजपक्षाला तंबूचा रस्ता दाखवला. भानुकाने उंच फटका मारण्याच्या नादात काशिफ दौडच्या हाती झेल देऊन बाद झाला. त्याने 8 चेंडूत 5 धावा केल्या. पाचव्या चेंडूवर चरिथ असालंकाला बाद केलं. व्रीत्या अरविंदनं झेल घेत तंबूचा रस्ता दाखवला. त्याला आपलं खातंही खोलता आलं नाही. सहाव्या चेंडूवर दासुन शनाकाला बाद करत टी 20 वर्ल्डकप स्पर्धेतील पहिली हॅटट्रीक पलानिपन मेयप्पननं आपल्या नावावर केली. दासुन शनाकाला क्लिन बोल्ड केलं.



T20 WC 2022: हार्दिक पांड्यानं जाहीर केलं लक्ष्य, Video शेअर करत म्हणाला, "देव माझ्यावर खूश आहे, आता..."


श्रीलंका संघ- पाथुम निस्सांका, कुसल मेंडिस, धनंजय डिसिल्वा, भानुका राजापक्षा, चरिथ असालंका, दासुन शनाका, वनिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, प्रमोद मदुशन, दुशमंथा चमीरा, महीश थीकशाना


यूएई संघ- मुहम्मद वसीम, चिराग सुरी, आर्यन लाक्रा, सीपी रिझवान, व्रीत्या अरविंद, बसिल हमीद. काशिफ दौड, आयन अफझल खान, पलानिपन मेयप्पन, जुनैद सिद्दिकी, जहूर खान