T20 World Cup UAE VS NED: टी 20 वर्ल्डकप स्पर्धेची रंगत पहिल्या दिवसापासून वाढत चालली आहे. पहिल्या सामन्यात नामिबियाने श्रीलंकेचा पराभव केला. तर दुसऱ्या सामन्यात नेदरलँड आणि यूएई यांच्या अतितटीचा सामना झाला. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेला हा सामना नेदरलँडने जिंकला. नेदरलँडने यूएईचा 3 गडी आणि 1 चेंडू राखून पराभव केला. यूएईने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात यूएईने 20 षटकात 8 गडी गमवून 111 धावा केल्या आणि विजयासाठी 112 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान नेदरलँडनं 19.5 षटकात 7 गडी गमवून पूर्ण केलं. या सामन्यातील एक प्रसंग सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यूएईचा खेळाडू आयान खान बाद झाल्यानंतर तंबूत परतत होता आणि सीमेरेषेला अडखळून पडला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिल्या डावातील शेवटच्या षटकातील पाचव्या चेंडूवर फ्रेड क्लास्सेननं आयान खानला बाद केलं. आयान खाननं 7 चेंडूत 5 धावा केल्या. पण तंबूत परतत असताना पाय अडखळला आणि पडला. यावेळी त्याने इथे तिथे न बघता उठून सरळ तंबूची वाट धरली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. युजर्स या व्हिडीओखाली काही खेळाडू मैदानात धडपडल्याच्या क्लिप शेअर करत आहेत.





असं असलं तरी आयान खानच्या नावावर विक्रम प्रस्थापित झाला आहे. आयान खानचं वय 16 वर्ष 335 दिवस असून T20 वर्ल्ड कपच्या इतिहासातील सर्वात तरुण खेळाडू आहे. यापूर्वी हा विक्रम पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद अमीरच्या नावावर होता. आमीरचं वय 17 वर्षे 55 दिवस असताना टी-२० विश्वचषकात पदार्पण केले होते. अफगाणिस्तानचा स्टार फिरकी गोलंदाज राशिद खान या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने 17 वर्षे 170 दिवस या वयात टी-20 विश्वचषकातील पहिला सामना खेळला होता.


यूएई- चिराग सुरी, मुहम्मद वसीम, काशिफ दौड, व्रीत्या अरविंद, झवर फरीद, बसील हमीद, सीपी रिझवान, आयान अफजल खान, पलानियापन मैयप्पन, जुनैद सिद्दीकी, जहूर खान


नेदरलँड- विक्रमाजित सिंह, मॅक्स ओडाउड, बस डीलीदी, कोलिन अकरमॅन, टॉम कूपर, स्कॉट एडवर्ड्स, रोलोफ वॅनदर मर्वे, टिम प्रिंगले, लोगन वॅन बीक, फ्रेड क्लास्सेन, पॉल मीकरेन