Sport News : टी-20 वर्ल्ड कपमधील भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधील सामन्यामध्ये भारताचा पराभव झाला आहे. या वर्ल्ड कपमधील भारताचा हा पहिला पराभव आहे. आफ्रिकेच्या वेगवान माऱ्यासमोर भारताच्या टॉप ऑर्डरच्या फलंदाजांनी नांगी टाकली. भारताने आफ्रिकेसमोर अवघ्या 134 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. आफ्रिकेने 5 विकेट्स आणि 2 चेंडू राखून विजय मिळवला आहे. या सामन्यातील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये स्टार खेळाडू विराट कोहली एक चूक करतो. या चूकीचा फटका संघालाही बसला आहे. आफ्रिकेच्या विकेट्स गेल्या होत्या आणि सामना भारताच्या पारड्यात जाताना दिसत होता. मात्र एडन मार्क्रमने खेळपट्टीवर तळ ठोकला आणि संघाची धुरा खांद्यावर घेतली. मार्क्रम आर. आश्विनच्या जाळ्यात सापडला होता मात्र विराट कोहलीने त्याच्या मोक्याच्यावेळी झेल सोडला.


आर. अश्विन. 12 वं षटक टाकत होता, त्या षटकामध्ये पाचव्या चेंडूवर एडन मार्क्रमने डीप मिड-विकेटच्या दिशेने टोलावला. तिथे विराट कोहली उभा होता. विराट कोहलीच्या हातात एक सोपा झेल आला होता. पण त्याने हा झेल सोडला, हे पाहून आर अश्विनला खूप आश्चर्य वाटले.


 



एवढेच नाही तर सुमारे 60 हजार प्रेक्षकांनी खचाखच भरलेले स्टेडियमध्ये भयान शांतता पसरली होती. आर. अश्विनही चकित झाला होता. पुढच्याच षटकात रोहित शर्माची साधी धावबाद होण्याची संधी हुकली. त्यामुळे भारताचा संघ दडपणाखाली आला. भारताला या दोन विकेट मिळाल्या असत्या तर निकाल काही वेगळा असता.