विराट कोहली उतरणार ओपनिंगला? रोहित मीडियासमोर स्पष्टच सांगितलं!
रोहितने विराटच्या स्थानाबाबत केलं मोठं वक्तव्य, म्हणाला....
T-20 World Cup : काही दिवसांंवर वर्ल्ड कप येऊन ठेपला असताना भारतीय संघाच्या बॅटिंग लाईनअपचा प्रश्न सुटताना दिसत नाही. आता भारताचा साऊथ आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाविरोधात टी-20 सामने होणार आहेत. ऑस्ट्रेलियाविरूद्ध 20 सप्टेंबरला पहिला टी-20 सामना होणार आहे. मात्र वर्ल्डकपमध्ये विराट कोहली ओपनिंगला उतरणार असल्याच्या चर्चांणा उधाण आलं होतं. अशातच विराटच्या जागेबाबत कर्णधार रोहित शर्माने स्पष्ट शब्दात सांगितलं आहे.
बॅटिंग लाईनअपमध्ये तुम्हाला पर्याय असणं केव्हाही फायद्याचं आहे. फलंदाजीच्या क्रमात कोणतीही अडचण आली नाही पाहिजे. आपण जेव्हा काही वेगळं करण्याचा प्रयत्न करतो मात्र आपण जसं ठरवलेलं असतं तसं होत नाही. ही एक समस्या आहे. के.एल. राहुल टी-20 विश्वचषकात ओपनिंग करणार असून विराट कोहली तिसरा ओपनप म्हणून पर्याय असल्याचं रोहित शर्मा म्हणाला.
विराटने आयपीएलमध्ये सलामीला उतरला आहे. त्यावेळी विराटने चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे आमच्यासाठी हा नक्कीच विराट हा ओपनर म्हणून एक पर्याय आहे, असं रोहितने ठणकावून सांगितलं आहे.
राहितने केली के. एल. ची पाठराखण
दरम्यान, के. एल. राहुल हा एक दर्जेदार खेळाडू आहे. तो संघासाठी खूप महत्त्वाचा खेळाडू असून तो टॉप ऑर्डरमध्ये खेळणार असल्याचं रोहितने स्पष्ट सांगितलं.
भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने कर्णधार रोहितला थेट आव्हान दिलंय. आगामी टी-20 मालिकेत टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला हरवू शकली नाही, तर वर्ल्ड कप जिंकणं त्यांच्यासाठी कठीण जाईल, असं गंभीर म्हणाला.