David Warner Retires : टी20 वर्ल्ड कपमध्ये 25 जून 2024 या दिवशी संपूर्ण क्रिकेट जगताला हैराण करणारी गोष्ट घडली. सुपर-8च्या शेवटच्या सामन्यात अफगाणिस्तानने बांगलादेशचा पराभव करत थेट टी20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) सेमीफायनल धडक मारली. पण अफगाणिस्तानच्या विजयामुळे ऑस्ट्रेलियाचा (Australia) संघ मात्र टी20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडला. सुपर-1 मध्ये ऑस्ट्रेलियाला तीनपैकी केवळ एक सामना जिंकता आला. तर अफगाणिस्तान दोन सामने जिंकत वरचढ ठरले. ऑस्ट्रेलियाचं टी20 वर्ल्ड कपमधलं आव्हान संपुष्टात आलं आणि त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नरची (David Warner) क्रिकेट कारकिर्दीही संपुष्टात आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा
डेव्हिड वॉर्नरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केलं आहे. त्याआधी चौथ्यांदा वर्ल्ड कप जिंकण्याचं वॉर्नरचं स्वप्न होतं. याआधी 2015 एकदिवसीय वर्ल्ड कप, 2021 टी20 वर्ल्ड कप आणि 2023 एकदिवसीय वर्ल्ड कप विजेत्या ऑस्ट्रेलियाचा संघाचा डेव्हिड वॉर्नर सदस्य होता. 37 वर्षांच्या वॉर्नच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधअये 49 सेंच्युरीसह 19 हजाराहून अधिक धावा जमा आहेत.


भारताविरुद्ध अंतिम सामना
डेव्हिड वॉर्नर तब्बल 15 वर्ष ऑस्ट्रेलियासाठी खेळला आहे. आपल्या क्रिकेट कारकिर्दीताल शेवटचा सामना तो भारताविरुद्ध खेळला. टी20 वर्ल्ड कप 2024 मध्यल्या सुपर-8 सामन्यात वॉर्नरने 6 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या सर्वोत्तम खेळाडूंमध्ये डेव्हिड वॉर्नरची गणना होते. 110 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 3277 धावा त्याच्या नावावर असून ऑस्ट्रेलियातर्फे सर्वाधिक धावा करणारा तो खेळाडू आहे. वॉर्नरने याआधीच एकदिवसीय आणि कसोटी सामन्यातून निवृत्तीची घोषणा केली होती.


वॉर्नरची क्रिकेट कारकिर्द
वॉर्नरने 112 कसोटी सामन्यात 44.60 च्या अॅव्हरेजने 8786 धावा केल्या आहेत. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने 161 सामन्यात 45.30 च्या अॅव्हरेजने 6932 धावा त्याच्या नावावर जमा आहेत. नोव्हेंबर 2023 मध्ये भारतात झालेल्या र्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात वॉर्नर शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. तर यावर्षी जानेवारी महिन्यात पाकिस्तानविरुद्धचा कसोटी सामना त्याचा शेवटचा होता. 


ऑस्ट्रेलियावर नामुष्की
एकदिवसीय वर्ल्ड कप विजेत्या ऑस्ट्रेलियाला टी20 वर्ल्ड कपमध्ये सेमीफायनलही गाठता आली नाही. ऑस्ट्रेलियाने सुपर-8 मध्ये धडक मारली. पण तीन सामन्यांपैकी तब्बल दोन सामन्यात ऑस्ट्रेलियाला दोन सामन्यात पराभव पत्करावा लागला. पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाचा 21 धावांनी पराभव केला. तर दुसऱ्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला 24 धावांनी धुळ चारली.