20 संघांचे खेळाडू, वेळापत्रक, सामन्यांचं ठिकाण... टी20 वर्ल्ड कपची सर्व माहिती एका क्लिकवर
T20 World Cup Schedule: टी20 वर्ल्ड कप 2024 आता अवघ्या काही तासांचा अवधी राहिला आहे. येत्या 2 जूनपासून वेस्ट इंडिज आण अमेरिकेत टी20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. टीम इंडियाचे सामने कधी असणार, कोणत्या दिवशी सुपर एटचे सामने रंगणार याची सर्व माहिती जाणून घेऊयात.
T20 World Cup Schedule, Veneus & Live Streaming: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धा अवघ्या काही तासांवर आली आहे. यजमान वेस्ट इंडिज आणि अमेरिका स्पर्धेसाठी सज्ज झालेत. यंदाच्या स्पर्धेत पहिल्यांदाच 20 संघ सहभागी झाले आहेत. प्रत्येकी पाच संघांचे चार ग्रुप तयार करण्यात आले असून ग्रुप सामन्यातील टॉप दोन संघ सुपर एटमध्ये (Super 8) खेळणार आहेत. क्रिकेट प्रेमींमध्ये कमालीची उत्सुकता आहे. त्यामुळे ही स्पर्धा कुठे पाहाता येणार, वेळापत्रक (T20 World Cup Scheduled) अस असणार, सामने कुठे खेळवले जाणार याची सर्व माहिती आपण जाणून घेणार आहोत.
टी20 वर्ल्ड कपचं संपूर्ण वेळापत्रक
2 जून, 2024:
सामना 1- अमेरिका विरुद्ध कॅनडा, टेक्सास (संध्याकाळी 7:30 वाजता)
सामना 2- वेस्टइंडीज विरुद्ध पापुआ न्यू गिनी, गयाना (भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता)
3 जून, 2024:
सामना 3- नामीबिया विरुद्ध ओमान, बारबाडोस (भारतीय वेळेनुसार रात्री 8:30 वाजता)
सामना 4- श्रीलंका विरुद्ध दक्षिण अफ्रीका, न्यूयॉर्क (भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता)
4 जून, 2024:
सामना 5- अफगानिस्तान विरुद्ध युगांडा, गुयाना (भारतीय वेळेनुसार रात्री 8:30 वाजता)
सामना 6- इंग्लंड विरुद्ध स्कॉटलँड, बारबाडोस (भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता)
सामना 7- नेदरलँड विरुद्ध नेपाळ (भारतीय वेळेनुसार रात्री 9 वाजता)
5 जून, 2024:
सामना 8- भारत विरुद्ध आयर्लंड, न्यूयॉर्क (भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता)
6 जून, 2024:
सामना 9- पापुआ न्यू गिनी विरुद्ध युगांडा, गुयाना (भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:30 वाजता)
सामना 10- ऑस्ट्रेलिया विरुद्ध ओमान, बारबाडोस (भारतीय वेळेनुसार रात्री 8:30 वाजता)
सामना 11- अमेरिका विरुद्ध पाकिस्तान, टेक्सास (भारतीय वेळेनुसार रात्री 9 वाजता)
7 जून, 2024:
सामना 12- नामीबिया विरुद्ध स्कॉटलँड, बारबाडोस (भारतीय वेळेनुसार रात्री 12:30)
सामना 13- कनाडा विरुद्ध आयर्लंड, न्यूयॉर्क (भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता)
8 जून, 2024:
सामना 14- अफगानिस्तान विरुद्ध न्यूजीलंड, गुयाना (भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:30 वाजता)
सामना 15- बांग्लादेश विरुद्ध श्रीलंका, टेक्सास (भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:30 वाजता)
सामना 16- नेदरलँड विरुद्ध दक्षिण अफ्रीका, न्यूयॉर्क (भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता)
सामना 17- ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, बारबाडोस (भारतीय वेळेनुसार रात्री 10:30 वाजता)
9 जून, 2024:
सामना 18- वेस्टइंडीज विरुद्ध युगांडा, गुयाना (भारतीय वेळेनुसार रात्री 8:30 वाजता)
सामना 19- भारत विरुद्ध पाकिस्तान, न्यूयॉर्क (भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता)
सामना 20- ओमान विरुद्ध स्कॉटलँड, एंटीगुआ (भारतीय वेळेनुसार रात्री 10:30 वाजता)
10 जून, 2024:
सामना 21- बांग्लादेश विरुद्ध दक्षिण अफ्रीका, न्यूयॉर्क (भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता)
11 जून, 2024:
सामना 22- कॅनडा विरुद्ध पाकिस्तान, न्यूयॉर्क (भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता)
12 जून, 2024:
सामना 23- नेपाळ विरुद्ध श्रीलंका, फ्लोरिडा (भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5 वाजता)
सामना 24- ऑस्ट्रेलिया विरुद्ध नामीबिया, एंटीगुआ (भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6 वाजता)
सामना 25- अमेरिका विरुद्ध भारत, न्यूयॉर्क (भारतीय वेळेनुसार रात्री 10:30 वाजता)
19 जून ते 24 जून दरम्यान सुपर-8 चे सामने खेळवले जाणार
तर 26 जून आणि 27 जून रोजी सेमीफाइनलचे सामने रंगणार
टी20 वर्ल्ड कपची फायनल 29 जून रोजी खेळवली जाणार
अफगाणिस्तान संघ
राशिद खान (कर्णधार), रहमानुल्लाह गुरबाज, इब्राहिम जादरान, अजमतुल्लाह उमरजई, नजीबुल्लाह जादरान, मोहम्मद इशाक, मोहम्मद नबी, गुलबदीन नायब, करीम जनत, नांग्याल खरोती, मुजीब उर रहमान, नूर अहमद, नवीन-उल-हक, फजलहक फारूकी , फरीद अहमद मलिक
रिजर्व: सेदिक अटल, हजरतुल्लाह जजई आणि सलीम सफी.
ऑस्ट्रेलिया संघ
मिशेल मार्श (कर्णधार), एश्टन एगर, पॅट कमिंस, टिम डेविड, नाथन एलिस, कॅमरून ग्रीन, जोश हेजलवुड, ट्रॅविस हेड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, मिशेल स्टार्क, मार्कस स्टोइनिस, मॅथ्यू वेड, डेविड वॉर्नर, एडम जम्पा
रिजर्व: जेक फ्रेजर-मॅकगर्क आणि मॅट शॉर्ट
बांग्लादेश संघ
नजमुल हुसैन शांतो (कर्णधार), तस्कीन अहमद, लिटन दास, सौम्या सरकार, तंजीद हसन तमीम, शाकिब अल हसन, तौहीद हृदोय, महमूद उल्लाह रियाद, जेकर अली अनिक, तनवीर इस्लाम, शक महेदी हसन, रिशाद हुसैन, मुस्तफिजुर रहमान, शोरफुल इस्लाम, तंजीम हसन साकिब.
रिजर्व: अफीफ हुसैन, हसन महमूद
कॅनडा संघ
साद बिन जफर (कर्णधार), एरोन जॉनसन, रविंदरपाल सिंह, नवनीत धालीवाल, कलीम सना, दिलोन हेइलिगर, जेरेमी गॉर्डन, निखिल दत्ता, परगट सिंह, निकोलस किर्टन, रेयानखान पठान, जुनैद सिद्दीकी, दिलप्रीत बाजवा, श्रेयस मोव्वा , ऋषिव जोशी.
रिजर्व : तजिंदर सिंह, आदित्य वरदराजन, अम्मार खालिद, जतिंदर मथारू, परवीन कुमार
इंग्लंड संघ
जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जोनाथन बेयरस्टो, हॅरी ब्रुक, सॅम कुरेन, बेन डकेट, टॉम हार्टले, विल जॅक, क्रिस जॉर्डन, लियाम लिविंगस्टोन, आदिल राशिद, फिल साल्ट, रीस टॉपले, मार्क वुड
भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या, यशस्वी जयसवाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, जसप्रित बुमराह, मोहम्मद सिराज.
रिजर्व : शुभमन गिल, रिंकू सिंह, खलील अहमद, अवेश खान
आयर्लंड संघ
पॉल स्टर्लिंग (कर्णधार), मार्क अडायर, रॉस अडायर, एंड्रयू बालबर्नी, कर्टिस कँपर, गॅरेथ डेलानी, जॉर्ज डॉकरेल, ग्राहम ह्यूम, जोश लिटिल, बॅरी मैक्कार्थी, नील रॉक, हॅरी टेक्टर, लोर्कन टकर, बेन व्हाइट, क्रेग यंग.
नामीबिया संघ
गेरहार्ड इरास्मस (कर्णधार), जेन ग्रीन, माइकल वान लिंगेन, डायलन लीचर, रूबेन ट्रम्पेलमैन, जॅक ब्रासेल, बेन शिकोंगो, तांगेनी लुंगामेनी, निको डेविन, जे जे स्मिट, जान फ्राइलिनक, जेपी कोट्ज, डेविड विसे, बर्नार्ड शोल्ट्ज, मालन क्रूगर, पीडी ब्लिग्नॉट.
नेपाळ संघ
रोहित पौडेल (कर्णधार), आसिफ शेख, अनिल कुमार साह, कुशल भुर्टेल, कुशल मल्ल, दीपेंद्र सिंह ऐरी, ललित राजबंशी, करण केसी, गुलशन झा, सोमपाल कामी, प्रतीस जीसी, संदीप जोरा, अबिनाश बोहरा, सागर ढकाल, कमल सिंह ऐरी
नेदरलँडचा संघ
स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार), आर्यन दत्त, बास डी लीडे, काइल क्लेन, लोगान वान बीक, मॅक्स ओ'डोड, माइकल लेविट, पॉल वान मीकेरेन, रयान क्लेन, साकिब जुल्फिकार, सिब्रांड एंगेलब्रेक्ट, तेजा निदामानुरु, टिम प्रिंगल, विक्रम सिंह, विव किंग्मा, वेस्ले बर्रेसी
रिजर्व- रयान क्लेन
न्यूझीलंड संघ
केन विलियमसन (कर्णधार), फिन एलन, ट्रेंट बोल्ट, माइकल ब्रेसवेल, मार्क चॅपमैन, डेवोन कॉनवे, लॉकी फर्ग्यूसन, मॅट हेनरी, डेरिल मिशेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिशेल सेंटनर, ईश सोढी. टिम साउथी
रिजर्व: बेन सियर्स
ओमान संघ
आकिब इलियास (कर्णधार), जीशान मकसूद, कश्यप प्रजापति, प्रतीक अठावले, अयान खान, शोएब खान, मोहम्मद नदीम, नसीम खुशी, मेहरान खान, बिलाल खान, रफीउल्लाह, कलीमुल्लाह, फैयाज बट, शकील अहमद, खालिद कैल.
रिजर्व: जतिंदर सिंह, समय श्रीवास्तव, सुफियान महमूद, जय ओडेद्रा
पपुआ न्यूगिनी संघ
असदुल्ला वाला (कर्णधार), एली नाओ, चाड सोपर, सीजे अमिनी, हिला वेरे, हिरी हिरी, जॅक गार्डनर, जॉन कारिको, काबुआ वागी मोरिया, किपलिंग डोरिगा, लेगा सियाका, नॉर्मन वनुआ, सेमा कामिया, सेसे बाउ, टोनी उरा
पाकिस्तान संघ
बाबर आझम (कर्णधार), अबरार अहमद, आजम खान, फखर जमान, हारिस रऊफ, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, मोहम्मद अब्बास अफरीदी, मोहम्मद आमिर, मोहम्मद रिजवान, नसीम शाह, सईम अयूब, शादाब खान, शाहीन शाह अफरीदी, उस्मान खान
स्कॉटलँड संघ
रिची बेरिंगटन (कर्णधार), मॅथ्यू क्रॉस, ब्रॅड करी, क्रिस ग्रीव्स, ओली हेयर्स, जॅक जार्विस, माइकल जोन्स, माइकल लीस्क, ब्रँडन मँकमुलेन, जॉर्ज मुन्से, सफयान शरीफ, क्रिस सोल, चार्ली टियर, मार्क वॉट, ब्रॅड व्हील
साउथ अफ्रीका संघ
एडेन मार्कराम (कर्णधार), ओटनील बार्टमैन, गेराल्ड कोएट्जी, क्विंटन डी कॉक, ब्योर्न फोर्टुइन, रीजा हेंड्रिक्स, मार्को जानसन, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, डेविड मिलर, एनरिक नॉर्टजे, कागिसो रबाडा, रयान रिकेलटन, तबरेज शम्सी, ट्रिस्टन स्टब्स
श्रीलंका संघ
वानिंदु हसरंगा (कर्णधार), चैरिथ असलांका, कुसल मेंडिस, पथुम निसांका, कामिंडु मेंडिस, सदीरा समरविक्रमा, एंजेलो मैथ्यूज, दासुन शनाका, धनंजय डी सिल्वा, महीश थीक्षाना, डुनिथ वेलालेज, दुष्मंथा चमीरा, नुवान तुषारा, मथीशा पथिराना, दिलशान मदुशंका.
रिजर्व्स: असिथा फर्नांडो, विजयकांत वियास्कंथ, भानुका राजपक्षे, जेनिथ लियानागे
युगांडा संघ
ब्रायन मसाबा (कर्णधार), साइमन सेसेसाजी, रोजर मुकासा, कॉसमास क्युवुता, दिनेश नाकरानी, फ्रेड अचेलम, केनेथ वैसवा, अल्पेश रामजानी, फ्रैंक एनसुबुगा, हेनरी सेसेनडो, बिलाल हसुन, रॉबिन्सन ओबुया, रियाजत अली शाह, जुमा मियाजी, रौनक पटेल
रिजर्व्स: इनोसेंट मवेबेज, रोनाल्ड लुटाया
अमेरिका संघ
मोनांक पटेल (कर्णधार), एरोन जोन्स, एंड्रीज गौस, कोरी एंडरसन, अली खान, हरमीत सिंह, जेसी सिंह, मिलिंद कुमार, निसर्ग पटेल, नितीश कुमार, नोशतुश केनजिगे, सौरभ नेथ्रलवकर, शैडली वान शल्कविक, स्टीवन टेलर, शायन जहांगीर
रिजर्व : गजानंद सिंह, जुआनॉय ड्राईस्डेल, यासिर मोहम्मद
वेस्टइंडीज संघ
रोवमॅन पॉवेल (कर्णधार), अल्जारी जोसेफ, जॉनसन चार्ल्स, रोस्टन चेज, शिम्रोन हेटमायर, जेसन होल्डर, शाई होप, अकील होसेन, शमर जोसेफ, ब्रँडन किंग, गुडाकेश मोती, निकोलस पूरन, आंद्रे रसेल, शेरफेन रदरफोर्ड, रोमारियो शेफर्ड.
भारतीय कुठे पाहू शकणार सामना
भारतीय क्रिकेट चाहते टी20 वर्ल्ड कपचे सर्व सामने स्टार स्पोर्टस् नेटवर्कवर लाईव्ह पाहू शकणार आहेत. तर डिज्नी प्लस हॉटस्टारवर सामन्यांचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहाता येणार आहे.
वेस्ट इंडिजच्या या मैदानांवर होणार सामने
सर विवियन रिचर्ड्स स्टेडियम, केंसिंग्टन ओवल, प्रोविडेंस स्टॅयम, डॅरेन सैमी क्रिकेट ग्राउंड, अर्नोस वेले स्टेडियम, ब्रायन लारा क्रिकेट अकादमी आणि क्वींस पार्क ओवल.
अमेरिकेतील या मैदानांवर होणार सामने
सेंट्रल ब्रोवार्ड पार्क, नासाउ काउंटी ग्राउंड आणि ग्रँड प्रेयरी स्टेडियम