Mohammed Siraj Vs Mohammad Rizwan High Voltage Drama Video: भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात दोन खेळाडूंमध्ये काही शाब्दिक देवाण-घेवाण झाली नाही किंवा काहीतरी वेगळं घडलं नाही तरच नवल. असाच प्रकार रविवारी अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील नौसी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडीयमवर टी-20 वर्ल्डकप स्पर्धेतील सामन्याच्या दुसऱ्या डावातील दुसऱ्याच ओव्हरमध्ये पाहायला मिळाला. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजच्या या ओव्हरमध्ये पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवान फलंदाजी करत असताना हा प्रकार घडलं. या दोन्ही क्रिकेटपटूंमध्ये वाद होईल की काय असं मैदानात घडलेल्या घटनेमुळे चाहत्यांना वाटल्यानेच समोरचा प्रकार पाहून मैदानात प्रेक्षकांचा एकच हुर्यो ऐकायला मिळाला.


नक्की घडलं काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झालं असं की, 1 ओव्हर 5 बॉलमध्ये पाकिस्तानच्या संघाने 120 धावांचा पाठलाग करताना 14 धावांपर्यंत एकही विकेट न गमावता मजल मारली. सिराजने त्याच्या पहिल्याच बॉलवर बाबरकडून चौकार खाल्ला. त्यानंतर पुढल्या चेंडूवर एक धाव काढून बाबर नॉन स्ट्राइकर्स एण्डला गेला अन् मोहम्मद रिझवान फलंदाजीसाठी आला. रिझवानला सिराजने तीन डॉट बॉल टाकले. त्यानंतर ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर रिझवानने पुढे येऊन सरळ बॅटने रिझवानच्या दिशेनेच चेंडू टोलवला. बॉल फेकल्यानंतरच्या फॉलो थ्रूमध्येच सिराजने चेंडू पकडला आणि फटका मारण्यासाठी क्रिझ सोडून पुढे आलेल्या रिझवानला बाद करण्याचा प्रयत्न केला. सिराजने हाती आलेला चेंडू अगदी द्वेषानेच रिझवानला धावबाद करण्याच्या दृष्टीने स्टम्पच्या दिशेने फेकला. मात्र या प्रयत्नात रिझवानलाच बॉल लागला.


सिराज स्टम्पवर चेंडू फेकतोय हे पाहून रिझवान क्रिझकडे वळाला. सिराज बॉल थ्रो करणार हे गृहित धरुन फिल्डींगमध्ये अडथळा आणला म्हणून बाद होऊ नये या हेतूने रिझवान खाली वाकून क्रिझकडे परत जाताना सिराजचा चेंडू त्याच्या उजव्या हाताच्या कोपराला लागला. सिराजने मारलेला चेंडू लागल्याने रिझवान पडल्या पडल्याच विव्हळला. त्याच्या हातातली बॅट सुटली. मात्र हाताला लागून चेंडू दूर गेल्याने तो ओव्हर थ्रोची चोरटी धाव घेण्यासाठी पळाला. या दुसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरील ड्राम सध्या सोशल मीडियावरर व्हायरल होताना दिसत आहे. आयसीसीनेही हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.



2)



3)



4)



मागितली माफी...


सिराजला आपली चूक लक्षात आल्यानंतर रिझवानची माफी मागितली. रिझवाननेही यावर फारसं व्यक्त न होता खेळावर लक्ष केंद्रित केलं. सिराजने रिझवानच्या जवळ जाऊन त्याच्या पाठीवर हात ठेवत माफी मागितली. मैदानातील हा ड्रामा पाहून प्रेक्षकांकडून मोठ्याप्रमाणात प्रतिसाद मिळाल्याचं चित्र दिसलं.


नक्की वाचा >> T20 World Cup: 'ते' 7 रन नसते मिळाले तर भारत पाकिस्तानविरुद्धची मॅच हरला असता; विजयाचे 'खरे हिरो' वेगळेच


पाकिस्तानकडून सर्वाधिक धावा


पाकिस्तानकडून रिझवानने या सामन्यात सर्वाधिक धावा केल्या. रिझवानच पाकिस्तानला विजय मिळवून देईल असं वाटत असतानाच जसप्रीत बुमराहने त्याला 15 व्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर क्लिक बोल्ड केलं. त्यानंतर पाकिस्तानी फलंदाजांची रांगच लागली. पाकिस्तानला शेवटच्या पाच ओव्हरमध्ये 32 धावाच करता आल्याने भारताने सामना 6 धावांनी जिंकला.