Pakistan Cricket Team Discussion In National Assembly: पाकिस्तानी पिपल्स पार्टीचे नेते अब्दुल कादीर पटेल यांनी शनिवारी पाकिस्तानी संसदेमध्ये देशाच्या क्रिकेट संघावर निशाणा साधला. सध्या अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये सुरु असलेल्या टी-20 वर्ल्ड कपमधील कामगिरीवरुन बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघाची खिल्ली उडवताना अब्दुल कादीर पटेल यांनी भारताविरुद्धच्या सामन्यात झालेल्या पराभवाचाही उल्लेख केला आहे. पाकिस्तानचा संघ टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये साखळी फेरीतच बाहेर पडला. साखळी फेरीमध्ये पाकिस्तानच्या संघाचा अमेरिका आणि भारताने पराभव केला. सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानला साखळी फेरीतूनच बाहेर पडण्याची नामुष्की सहन करावी लागली आहे. 2023 च्या उत्तरार्धामध्ये भारतात आयोजित केलेल्या एकादिवसीय क्रिकेट वर्ल्ड कपमध्येही पाकिस्तानला साखळी फेरीतच बाहेर पडावं लागलं होतं. 


कोण आणि काय म्हणालं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या पाकिस्तानी संघावर चौफेर टीका होताना दिसत आहे. चाहते, वृत्तवाहिन्या, प्रसारमाध्यमे, आजी-माजी क्रिकेटपटू, इतर देशांचे क्रिकेटपटूंबरोबरच आता थेट पाकिस्तानी राजकारण्यांनीही संघावर भाष्य करण्यास सुरुवात केली आहे. अब्दुल कादीर पटेल यांनी बाबर आझमला उपहासात्मक सल्ले दिले आहेत. बाबरने ही टी-20 क्रिकेट स्पर्धा म्हणजे त्याच्याविरुद्ध रचलेला कट असल्याचं सांगावं. यासंदर्भात त्याने एक सविस्तर पत्र लिहावं. त्यानंतर हे पत्र गायब झाल्याचं जाहीर करावं. या टीकेचा रोख पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान हे सध्या तुरुंगात असलेल्या प्रकरणाशी आहे. इम्रान खान यांचा बाबरवर वरदहस्त होता असं पाकिस्तानी राजकीय वर्तुळाबरोबरच क्रिकेट वर्तुळातही म्हटलं जातं. इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानने एकदिवसीय क्रिकेटचा वर्ल्ड कप 1996 साली जिंकला होता. 


नक्की पाहा >> Video: विराटला खुन्नस दिल्याचा रोहितने घेतला बदला! बांगलादेशचा कॅप्टन Out झाल्यानंतर..


हातात कागद घेऊन जाहीर करावं


इम्रान यांचा अप्रत्यक्षपणे संदर्भ देत अब्दुल कादीर पटेल यांनी संसदेमध्ये, "आपल्या क्रिकेट संघाला झालं काय आहे?" असा सवाल उपस्थित केला. "हे अमेरिकेकडून पराभूत झाले. भारताकडून पराभूत झाले. असं असेल तर बाबर आझमने आपल्या एका वरिष्ठ क्रिकेटपटूकडून आदर्श घेऊन एक सभा आयोजित करावी आणि हातात असा कागद घेऊन जाहीर करावं की हा पाहा माझ्याविरुद्ध कट रचला जातोय," असं अब्दुल कादीर पटेल म्हणाले. त्यांचं हे विधान ऐकून सारेच सत्ताधारी खासदार हसू लागले. सत्ताधारी पक्षाच्या नेत्याच्या या विधानावरुन अनेकांनी बाकं वाजवून समर्थन दिलं.


नक्की वाचा >> 'मॅचदरम्यान ड्रेसिंग रुममध्ये 4-5 खेळाडू...'; पाकिस्तानी टीमबद्दल धक्कादायक खुलासा


फिक्सिंगच्या आरोपांचाही उल्लेख


"(हे पत्र दिल्यानंतर) तुम्ही हरा, मरा किंवा काहीही करा! नंतर त्याने ते पत्रही हारवल्याचं सांगावं. पीसीबीवाले त्याला पकडून, ते पत्र दाखव तुम्ही का हरलात पाहू दे असं म्हणतील तेव्हा त्याने ते पत्र हारवल्याचं सांगावं. बाबर आझमवर मॅच फिक्सिंगचे आरोप लागले आहेत. मात्र आता तरी पाकिस्तानसाठी एकत्र यावं," अशी विनंती अब्दुल कादीर पटेल यांनी आपलं म्हणणं संपवताना केली.



अब्दुल कादीर पटेल यांच्या या खोचक टोलेबाजीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.