T20 World Cup India vs Australia : टी20 वर्ल्ड कप 2024 च्या सेमीफायनल लढती सरळसोपी वाटत असताना अचानक त्यात ट्विस्ट आला आहे. टीम इंडियाने (Team India) सुपर-8 (Super-8) सामन्यात सलग दोन सामने जिंकत सेमीफायनलमधलं (Semi Final) स्थान निश्चित केलं असं वाटत असतानाच ऑस्ट्रेलियाने सर्व समीकरणच बदलून टाकली. सुपर-8 मध्ये अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाचा 21 धावांना पराभव करत ग्रुप-1 मध्ये रंगत निर्माण केली आहे. या एका विजयाने अफगाणिस्तानही सेमीफायनलच्या शर्यतीत चुरस कायम ठेवली आहे. यामुळे भारत आणि ऑस्ट्रेलियाची डोकेदुखी वाढली आहे. या सामन्यात 40 धावांचं समीकरण महत्त्वांच ठरणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुपर-1 राऊंडमध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि बांगलादेश संघांचा समावेश आहे. टीम इंडियाने आधी अफगाणिस्तान आणि नंतर बांगलादेसचा पराभव करत 4 पॉईट जमा केले आणि पहिल्या स्थानावर झेप घेतली. ऑस्ट्रेलियाने पहिल्या सामन्यात बांगलादेशचा सहज पराभव केला. पण दुसऱ्या सामन्यात मोठा उलटफेर झाला. अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत मोठा धक्का दिला. त्यामुळ ग्रेप-1 मधलं सेमीफायनचं गणित पुरतं बिघडलंय.


टीम इंडिया कशी गाठणार सेमीफायनल?
ग्रुप-1 मध्ये टीम इंडिया पहिल्या स्थानावर आहे. पण टीम इंडियासमोर एक आव्हान असणार आहे. ग्रुप-1 मधून सेमीफायनलमध्यो कोणते दोन संघ सेमीफायनल गाठणार याचा फैसला सोमवारी भारत आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सासन्यानंतर होईल. टीम इंडियाला सेमीफायनल गाठण्यासाठी फक्त ऑस्ट्रेलियाला हरवावं लागणार आहे. या विजयामुळे टीम इंडियाच्या खात्यात सहा पॉईंट जमा होतील. तर ऑस्ट्रेलियाला सेमीफायनल गाठण्यसाठी भारताविरुद्ध जिंकावच लागणार आहे. 


40 धावांचं समीकरण
भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यात 40 धावांचं समीकरण महत्त्वाचं ठरणार आहे. ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला तरी टीम इंडियासाठी महत्त्वाचं ठरणार आहे ते म्हणजे विजयाचं हे अंतर कमी ठेवणं. टीम इंडियाचा 40 किंवा त्यापेक्षा जास्त धावांनी पराभव होता कामा नये. जर असं झालं तर ऑस्ट्रेलियाच नेट रनरेट वाढेल आणि ऑस्ट्रेलिया टीम इंडियाच्या पुढे जाईल. इतकंच नाही तर आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने 31 चेंडूच्या आधी विजय मिळवला तरी टीम इंडियाचं गणित बिघडू शकतं. 


अफगाणिस्तान-बांगलादेश सामन्यावर नजर
ग्रुप-1 च्या शेवटच्या सामन्यात बांलगालदेशने अफगाणिस्तानचा पराभव केला आणि दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने मोठ्या फरकाने टीम इंडियाचा पराभव केला, तर टीम इंडियाला मोठं नुकसान होईल. ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय किंवा पराभव झाल्यास टीम इंडिया ग्रुपमध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या स्थानावर राहिल. पण कोणत्याही परिस्थित टीम इंडियाला दुसरी सेमीफायनल खेळायची आहे. दुसरी सेमीफायनल पावसाने रद्द झाली तर ग्रुप-1 मधील संघ फायनलमध्ये प्रवेश करेल.