Adam Zampa Corona Positive : भारत पाकिस्तान सामन्यानंतर T20 World Cup ला धमाकेदार अंदाजात सुरूवात झाली आहे. क्वालिफायर राऊंड झाल्यानंतर आता Super 12 सामन्यांना सुरूवात झाली. अशातच आता क्रिकेटप्रेमींसाठी वाईट बातमी समोर आली आहे. T20 World Cup मध्ये कोरोनाची (Corona) एन्ट्री झाल्याचं पहायला मिळतंय. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू कोरोनाबाधित झाल्याची माहिती समोर आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

T20 विश्वचषकातील गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा आज श्रीलंकेशी सामना होत आहे. याआधी संघासाठी एक वाईट बातमी समोर आली. लेगस्पिनर अॅडम झाम्पा (Adam Zampa) याला कोरोनाची लागण झाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सध्या झंपामध्ये कोरोनाची लक्षणे कमी दिसत आहेत. अशा स्थितीत श्रीलंकेविरुद्धच्या प्लेइंग-11मध्ये त्याचा समावेश करण्यात आलेला नाही.


कोरोनाबाधित खेळाडू खेळणार...


यंदा टी-20 विश्वचषकासाठी कोरोनाच्या नियमांमध्ये (t20 world cup 2022 covid19 rules) बदल करण्यात आले आहेत. T20 विश्वचषकादरम्यान आयसीसीने कोरोनाची लागण झालेल्या खेळाडूंना सामन्यात खेळण्याची परवानगी दिली आहे. याआधी कोरोनाबाधित खेळाडूला वेगळे करण्यात येत होतं. तो पूर्णपणे बरा झाल्यावरच त्याला खेळण्याची परवानगी देण्यात येत होती. आता आयसीसीने यात बदल केलाय. 


आणखी वाचा - Team India : "रोहित शर्मानंतर 'हा' खेळाडू असणार टीम इंडियाचा नवा कॅप्टन"


दरम्यान, कोविड पॉझिटिव्ह खेळाडूंनाही खेळण्याची परवानगी देण्यात असल्याने त्याचा टी-ट्वेंटीवर परिणाम होण्याची शक्यता नाही. मात्र, खेळाडूच्या आरोग्याचा विचार करून त्याला संघात सामील करून घ्याचं की नाही? यावर संघाचा कॅप्टन आणि कोचला निर्णय घ्यावा लागणार आहे.