T20 World Cup पूर्वी बाबर आझमने दाखवला दमखम, `हा` विक्रम मोडीत काढला
विराट,रोहितला टाकलं मागे, बाबर आझमने केला `हा` मोठा व्रिकम
पर्थ : T20 World Cup 2022 यंदाच्या टी20 वर्ल्ड कपला येत्या 16 ऑक्टोबरपासून सुरूवात होणार आहे. या वर्ल्ड कपआधीच पाकिस्तानच्या कर्णधाराने सर्व संघाला दाखवून दिले आहे की, त्यांचा संघ कोणत्याही संघापेक्षा कमी नसणार आहे. त्यामुळे पाकिस्तान संघाला हलक्यात घेण आता इतर संघाना महागात पडणार आहे.
खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून आऊट ऑफ फॉर्म असलेला पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) फॉर्ममध्ये परतलाय. त्याने बांगलादेशविरुद्ध 40 चेंडूत शानदार अर्धशतक झळकावले आहे. या खेळीसोबतच त्याने भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) आणि भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) यांचा खास विक्रम मोडीत काढला आहे.त्यामुळे टी20 वर्ल्ड कपपूर्वी परतलेला त्याचा फॉर्म इतर संघाची डोकेदुखी वाढवू शकतो.
हे ही वाचा : T20 World Cup पू्र्वी स्टार खेळाडूला सुनावली पोलीस कस्टडी, जाणून घ्या संपुर्ण प्रकरण
विराट विक्रम मोडीत
पाकिस्तानचा 27 वर्षीय फलंदाज बाबर आझमने (Babar Azam) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 11 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. बाबरने अवघ्या 251 डावात ही कामगिरी केली आहे. आता तो सर्वात जलद 11 हजार धावा करणारा आशियाई खेळाडू बनला आहे. बाबरच्या आधी हा विक्रम विराट कोहलीच्या (Virat Kohli) नावावर होता, त्याने 261 डावात हा विक्रम केला होता. त्याचबरोबर या यादीत तिसरा क्रमांक भारताचा माजी कर्णधार आणि महान फलंदाज सुनील गावस्करचा आहे, त्यांनी 262 डावांमध्ये 11 हजार धावा केल्या होत्या. या खेळीसह पाकिस्तानसाठी अशी कामगिरी करणारा तो 11वा खेळाडू ठरला आहे.
हे हि वाचा : T20 World Cup पुर्वी मोठी खेळी! 'हा' संघ बदलणार कर्णधार
टीम इंडियाच्या कर्णधारालाही टाकलं मागे
विराट कोहलीशिवाय बाबरने भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मालाही (Rohit Sharma) मागे टाकले आहे. बाबरने तिरंगी मालिकेत बांगलादेशविरुद्ध 29 टी-20 आंतरराष्ट्रीय अर्धशतक झळकावले. आता तो आंतरराष्ट्रीय T20 मध्ये सर्वाधिक अर्धशतक ठोकणारा खेळाडू बनला आहे.बाबरच्या आधी हा विक्रम भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या नावावर होता, त्याने आपल्या T20 कारकिर्दीत 28 आंतरराष्ट्रीय टी-20 अर्धशतके झळकावली आहेत.
हे हि वाचा : T20 World Cup 2022: क्रिकेटमध्ये 'हा' कर्णधार करतो सर्वाधिक कमाई, नेटवर्थ जाणून घ्या
दरम्यान न्यूझीलंडमध्ये खेळल्या जात असलेल्या तिरंगी मालिकेत गुरुवारी पाकिस्तानने बांगलादेशचा टी-20 सामन्यात 7 गडी राखून पराभव केला. या सामन्यात मोहम्मद रिझवानने (Mohammad Rizwan) पुन्हा एकदा अर्धशतक झळकावले. रिझवानचे गेल्या 10 सामन्यांमधील हे सहावे अर्धशतक आहे. मोहम्मद रिझवान आणि बाबर आझमचा (Babar Azam) फॉ़र्म इतर संघासाठी वर्ल्ड कपमध्ये महागात पडू शकतो.