T20 World Cup 2024 : अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत टीम इंडियाने (T20 World Cup) आयसीसी टी20 वर्ल्ड कपवर नाव कोरलं.  तब्बल 17 वर्षांनंतर टीम इंडियाने दुसऱ्यांना टी20 वर्ल्ड कप जिंकण्याची किमया केली आहे. पण आता टीम इंडिया एका नवा अडचणीत सापडली आहे. भीषण वादळामुळे टीम इंडिया बारबाडोसमध्येच अडकली आहे (Team India Stuck Due To Hurricane Beryl). त्यामुळे टी20 चॅम्पियन टीम इंडिया भारतात परतण्यास उशीर होणार आहे. मायदेशात विजेत्या टीमचं स्वागत करण्यास करोडो क्रिकेट चाहते प्रतीक्षा करतायत. जल्लोषाची तयारी देखील पूर्ण झाली आहे. पण वादळामुळे बारबाडोसमधून बाहेर पडण्यासाठी टीम इंडियाला सोमवारी उशीरा किंवा मंगळवारी सकाळची वाट पाहावी लागणार आहे. तीन जुलैला टीम इंडिया भारतात परतण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बारबाडोसमध्ये भीषण वादळ
टी20 वर्ल्ड कपवर नाव कोरल्यानंतर टीम इंडियाला भारतात पोहोचण्यासाठी बारबाडोसहून (Barbados) न्यूयॉर्कला यायचं होतं. न्यूयॉर्कवुन टीम इंडिया भारतासाठी रवाना होणार होते. पण वादळाचा धोका लक्षात घेता टीम इंडियाच्या परतली वेळ लागणार आहे. बारबाडोसमध्ये बेरिल नावाच्या वादळाने थैमान घातलं आहे. बेरिल वादळाचा धोका लक्षात घेता बारबाडोस विमानतळ देखील एका दिवसासाठी बंद करण्यात आलं आहे. बेरीलमुळे सर्व उड्डाण रद्द करण्यात आली आहेत. टी20 वर्ल्ड कप विजेत्या टीम इंडियाला आता वादळ शांत होईपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. 


टीम इंडिया भारतात कधी परतणार?
वादळ शांत झाल्यानंतर बारबाडोस विमानतळ खुलं करण्यात येईल. त्यानंतर टीम इंडिया मायदेश परतण्यसाठी रवाना होईल. 3 जुलैला टीम इंडियाची मायदेशी एन्ट्री होईल. भारताता टीम इंडियाच्या स्वागतासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. रोहित शर्माच्या नेतृ्त्वाखाली तब्बल 17 वर्षांनंतर टीम इंडियाने दुसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कपवर नाव कोरलं आहे. याआधी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पहिला टी20 वर्ल्ड कप म्हणजे 2007 टी20 वर्ल्ड कप जिंकला होता. 


टीम इंडियाला कोट्यवधीचं बक्षीस
टी20 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या टीम इंडियावर बीसीसीआयने पैशांची बरसात केली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ऐतिहासिक विजय मिळवणाऱ्या टीम इंडियासाठी तब्बल 125 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. टीम इंडियाच्या विजायवर बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी टीम इंडियातल्या सर्व खेळाडूंचे, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफचं कौतुक केलं आहे. टीम इंडियाने संघभावना आणि दृढ संकल्प दाखवत खेळ केला, यासाठी त्यांचं अभिनंदन असं सचिव जय शहा यांनी म्हटलं आहे.