T20 World Cup : गत वर्ल्ड कपविजेत्या ऑस्ट्रेलियावर मायदेशातच नामुष्की!
इंग्लंडचा पराभव झाल्याने यजमान ऑस्ट्रेलियाच्या सेमीफायनला (semifinal) जाण्याच्या सर्व आशा मावळल्या. जर आजच्या सामन्यात इंग्लंडचा पराभव झाला असता तर नेट रनरेटच्या माध्यमातून ऑस्ट्रेलियाला सेमीफायनलला पोहोचण्याचा मार्ग होता.
T20 World Cup : टी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) आता अंतिम टप्प्यात आला आहे. सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर (sydney cricket groud) झालेल्या आजचा सामन्या इंग्लंडसाठी (England) करो या मरोच्या स्थितीचा होता. मात्र त्याचसोबत हा सामना यजमान टीम ऑस्ट्रेलियासाठीही (Australia) महत्त्वाचा होता. आजच्या या सामन्यात इंग्लंडचा पराभव झाल्याने यजमान ऑस्ट्रेलियाच्या सेमीफायनला (semifinal) जाण्याच्या सर्व आशा मावळल्या. जर आजच्या सामन्यात इंग्लंडचा पराभव झाला असता तर नेट रनरेटच्या माध्यमातून ऑस्ट्रेलियाला सेमीफायनलला पोहोचण्याचा मार्ग होता.
या सामन्यात श्रीलंकेने इंग्लंडला विजयासाठी 142 रन्सचं लक्ष्य दिलं होतं. इंग्लंडच्या बेन स्टोक्सच्या 42 रन्सच्या खेळीने इंग्लंडने अखेरच्या ओव्हरमध्ये विजय मिळवला. सामन्याच्या मध्ये एक वेळ अशी आली होती, जेव्हा इंग्लंड हा सामना हरेल अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र बेन स्टोक्सने शेवटी आपल्या टीमला सेमीफायनपर्यंत पोहोचवलंच.
ग्रुप 1 मध्ये न्यूझीलंड अव्वल
ग्रुप 1 मध्ये सर्व खेळ हा रनरेटचा ठरला. न्यूझीलंड, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या तिन्ही टीम्सचे पॉईंट्स 7 आहेत. मात्र न्यूझीलंडचं रनरेट +2.113 इतकं असल्याने ते ग्रुपमध्ये टॉपवर आहेत. तर इंग्लंडच रनरेट +0.473 इतकं असल्याने त्यांना दुसरं स्थान देण्यात आलंय. रनरेटच्या मोजणीचा फटका ऑस्ट्रेलियाला बसला, कारण ऑस्ट्रेलियाचं रनरेच मायनसमध्ये आहे. त्यामुळे त्यांना तिसरं स्थान मिळालं.
नियमांनुसार, दोन्ही ग्रुपमधून टॉप 2 टीम्स सेमीफायनलमध्ये धडकणार आहे. त्यामुळे ग्रुप 1 मधून न्यूझीलंड आणि इंग्लंड यांना सेमीफायनलच तिकीट मिळालं आहे. ऑस्ट्रेलिया तिसऱ्या क्रमांकावर असल्याने त्यांचं यावर्षी वर्ल्डकपचं स्वप्न भंगलं आहे.
इंग्लंडचा विजय
श्रीलंकेकडून सलामीवीर पाथूम निसांकाने 67 धावांवची दमदार अर्धशतकी खेळी केली. राजपक्षे 22 धावा आणि कुसल मेंडिस 18 धावा हे तीन फलंदाज वगळता इतर कोणत्याही फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. त्यामुळे श्रीलंकेने 141 धावांपर्यंतच मजल मारता आली. इंग्लंडकडून मार्क वूडने सर्वाधिक 3 गडी बाद केले तर बेन स्टोक्स, ख्रिस वोक्स, सॅम करन आणि आदिल रशिद यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
इंग्लंड संघ लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरल्यावर मजबूत सुरूवात केली. 75 धावांची सलामी दिली होती बटरलला 28 धावांवर वानिंदू हसरंगाने बाद करत ही जोडा फोडली. अॅलेक्स हेल्सने आक्रमक सुरूवात केली होती त्यालाही 47 धावांवर हसरंगाने माघारी पाठवलं.