T20 World Cup Final : पाकिस्तानचा पराभव करत इंग्लंड दुसऱ्यांदा `जगज्जेते`, स्टोक्स ठरला हिरो
टी-20 वर्ल्डकपमध्ये रंगलेल्या फायनलच्या (T20 World Cup Final) सामन्यात अखेर इंग्लंडने (ENGvsPAK) बाजी मारली. या विजयाने इंग्लंडने दुसऱ्यांदा वर्ल्डकपवर (World cup win) आपलं नाव कोरलं आहे.
T20 World Cup Final : टी-20 वर्ल्डकपमध्ये रंगलेल्या फायनलच्या (T20 World Cup Final) सामन्यात अखेर इंग्लंडने (ENGvsPAK) बाजी मारली. अंतिम सामन्यात पाकिस्तानचा 5 विकेट्सने पराभव करत ब्रिटीशांनी वर्ल्डकप जिंकला आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर सुरु असलेल्या सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजांनी अखेर विजय खेचून आणला. मुख्य म्हणजे यंदाच्याही वर्ल्डकपचा शिल्पकार बेन स्टोक्स ठरलाय. या विजयाने इंग्लंडने दुसऱ्यांदा वर्ल्डकपवर (World cup win) आपलं नाव कोरलं आहे.
दरम्यान, वर्ल्ड कप ( T20 World Cup Final) जिंकण्यासाठी इंग्लंडला फक्त 138 रन्सची गरज होती. 19 व्या ओव्हरमध्येच इंग्लंडच्या फलंदाजांनी हे लक्ष्य पूर्ण केलंय. या सामन्यात बेन स्टोक्सने उत्तम खेळी करत अर्धशतक मारलीये. दरम्यान लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडला पहिला झटका लवकर बसला. अॅलेक्स हेल्स केवळ एका रन्सवर बाद झाला.
बेन स्टोक्सची मॅच विनिंग खेळी
इंग्लंडचा धडाकेबाज खेळाडू बेन स्टोक्सने पुन्हा एकदा मॅचविनर असल्याचं सिद्ध केलंय. बेन स्टोक्सने 49 बॉल्समध्ये नाबाद 52 रन्स केले. या खेळीत स्टोक्सने 5 फोर आणि 1 सिक्स लगावलाय. बेन स्टोक्सशिवाय जॉस बटलरने 26 रन्स केले.
पाकिस्तानची फलंदाजी
पाकिस्तानची सुरूवात खराब झाली. षटकार खेचणारा मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) लवकर बाद झाला. त्यानंतर मोहम्मद हॅरिस देखील 8 धावा करत बाद झाला. त्यानंतर कॅप्टन बाबरने (babar azam) जबाबदारी घेतली. त्याला मसूदने देखील मोलाची साथ दिली.
मात्र, आदिल रशिदने (adil rashid) कॅप्टन बाबरला तंबूत पाठवलं आणि पाकिस्तानच्या आशा मावळल्या. त्यानंतर बटलरने (jos buttler) पेस बॉलरला आणलं आणि पाकिस्तानची टीम पत्त्यासारखी कोसळली आणि पाकिस्तानने 137 धावा केल्या.