मेलबर्न: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मेलबर्न येथे ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना सुरु आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत १८४ धावांचा डोंगर उभा केला. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची अवस्था बिकट झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियन संघाने सुरुवातीच्या चेंडुपासूनच आक्रमक खेळ करत आपला मनसुबा स्पष्ट केला होता. ऑस्ट्रेलियाच्या डावाला आकार देण्यात एलिसा हिली हिने महत्त्वाची भूमिका बजावली. जे कोणत्याही क्रिकेटपटूला जमले नाही ते हिलीने करून दाखवले आहे. 


Ind vs Aus: भारत-ऑस्ट्रेलियात आज निर्णायक लढत; पंतप्रधानांमध्ये रंगली जुगलंबदी


हिलीने विश्वचषकाच्या अंतिम फेरीत सर्वात जलद अर्धशतक झळाकावण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. आतापर्यंत झालेल्या पुरुषांच्या आणि महिलांच्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत कोणत्याही फलंदाजाला अशी कामगिरी करता आलेली नाही.


हिलीने भारताविरुद्धच्या अंतिम फेरीत चौकारानिशी आपले अर्धशतक साजरे केले. हिलीने यावेळी ३० चेंडूंत आपले अर्धशतक साजरे केले. ७५ धावांच्या आपल्या खेळीत तिने ७ चौकार आणि दोन षटकार लगावले. पुरुषांच्या वनडे, ट्वेन्टी-२० किंवा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एकाही फलंदाजाला एवढ्या आक्रमकपणे फलंदाजी करता आलेली नाही.