T20 WC: हार्दिक पांड्याच्या स्वागतालाही न आलेल्या पत्नी नताशाने शेअर केली नवी पोस्ट, म्हणते `मी आता...`
Natasa Stankovic Instagram Post: टी-20 वर्ल्डकप (T20 World Cup ) जिंकल्यानंतर भारतात परतलेल्या हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) स्वागतासाठी पत्नी नताशा (Natasa Stankovic) हजर न राहिल्याची चर्चा होत असताना आता तिने नवी पोस्ट शेअर केली आहे. तिची पोस्ट पाहिल्यानंतर आता सर्वांनाच त्यांचा घटस्फोट झाल्याची चर्चा खरी असल्याचं वाटत आहे.
Natasa Stankovic Shares New Post: आयीसीसी टी-20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या संपूर्ण संघासह 4 जुलैला भारतात दाखल झाला आहे. भारतीय संघासह सेलिब्रेशन केल्यानंतर हार्दिक पांड्याने आपल्या कुटुंबासहदेखील आनंद साजरा केला. हार्दिक पांड्या घऱी पोहोचल्यानंतरचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. दरम्यान हार्दिक घरी परतल्यानंतर करण्यात आलेल्या सेलिब्रेशनमध्ये नताशा स्टेनकोविकची (Natasa Stankovic) अनुपस्थिती सर्वांना प्रकर्षाना जाणवत होती. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे. यादरम्यान नताशाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटला एक नवी पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने आपण आभारी असल्याचा उल्लेख केला आहे.
नताशा स्टेनकोविकने शेअर केली नवी पोस्ट
नताशा स्टेनकोविकने (Natasa Stankovic Instagram) नुकतंच इंस्टाग्रामला नवी पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने अनेक फोटो आणि एक व्हिडीओ शेअर केला आहे. ही पोस्ट शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'Living in Gratitute'. यावेळी तिने हार्ट इमोजीही वापरलं आहे.
नताशाने पहिला फोटो स्वत:चा शेअर केला आहे, ज्यामध्ये ती पांढरा शर्ट घालून कारमध्ये बसलेली दिसत आहे, दुसऱ्या फोटोमध्ये सनस्क्रीन आणि तिसऱ्या फोटोमध्ये जिम मिरर सेल्फी पोस्ट केला आहे. चौथा फोटो फूडचा आहे आणि पाचव्या फोटोत नताशा तिचा मुलगा अगस्त्यसोबत स्पेस सूटमध्ये दिसत आहे. यानंतर सर्बियन मॉडेल आणि अभिनेत्रीने एक व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे, जी तिच्या मुलाने शूट केली आहे, ज्यामध्ये नताशा कॅमेरासाठी पोज देताना दिसत आहे. नताशाची नवीन पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नताशाने दोन दिवसांपूर्वी एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये नताशा कॅमेऱ्यासमोर मेकअप करताना दिसली होती. तिने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं होतं की, 'देवा, माझी मदत कर. जेव्हा मी अडचणीत असेन तेव्हा माझे रक्षण कर'. हार्दिक पांड्या भारतात परतल्यानंतर नताशाने केलेली ही पोस्टही सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.
घटस्फोटाच्या चर्चांवर मौन
नताशा आणि हार्दिक पांड्या यांच्या विभक्त होण्याच्या आणि घटस्फोटाच्या अफवा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत. मात्र अद्यापपर्यंत नताशा किंवा हार्दिक यांनी यावर मौन बाळगलं आहे. दोघांनीही यावर अधिकृत भाष्य केलेलं नाही, पण कोणत्याही फोटो, व्हिडीओत ते एकत्र दिसत नसल्याने नेटकरी यावर शिक्कामोर्तब करत आहेत.