T20 WC Team of the Tournament : आयसीसीने टी20 वर्ल्ड कप 2024 ची 'टीम ऑफ द टूर्नामेंट'ची घोषणा केली आहे. टी20 वर्ल्ड चॅम्पियन ठरलेल्या टीम इंडियातील (Team India) सहा खेळाडूंना आयसीसीने या संघात संधी दिली आहे. तर उपविजेत्या ठऱलेल्या दक्षिण आफ्रिकेचा एका खेळाडू प्लेईंग इलेव्हनमध्ये नाही. बारावा खेळाडू म्हणून दक्षिण आफ्रिकेच्या एका खेळाडूचा समावेश करण्यात आला आहे. आयसीसीने (ICC) जाहीर केलेली बेस्ट प्लेईंग इलेव्हन (Playing XI) अशी आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहित शर्मा
टीम इंडियने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली दुसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कपवर नाव कोरलं आहे. कर्णधार रोहित शर्माने आपल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाला शानदार सुरुवात करुन दिली आहे. 156.7 च्या स्टाईक रेटने रोहित शर्माने  257 धावा केल्या. यंदाच्या स्पर्धेतील ही दुसरी सर्वाधिक धावसंख्या आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धची फलंदाजी या स्पर्धेतील रोहितची नंबर वन खेळी ठरली आहे. अवघ्या 41 चेंडूत रोहितने 92 धावा केल्या होत्या. तर  सेमीफायनलमध्ये इंग्लंडविरुद्झ रोहितने 39 चेंडूत 57 धावा केल्या. फलंदाजीबरोबरच कर्णधार म्हणूनही रोहितने उत्तम कामगिरी बजावली आहे. 


रहमानुल्लाह गुरबाज
अफगाणिस्तानचा सलामीवीर रहमानुल्लाह गुरबाजने यंदाच्या टी20 वर्ल्ड कपवर छाप उमटवली आहे. गुरबाजने सलमीला येत तीन शतकी भागिदारी केल्या आहेत. अफगाणिस्तानला सेमीफायनलपर्यंत पोहोचवण्यात रहमानुल्लाह गुरबाजची महत्त्वाची भूमिका होती. गुरबाजने युंगाडा  (76), न्यूझीलंड (80), ऑस्ट्रेलिया (60) आणि बांगलादेश (43) धावांची महत्त्वपूर्ण खेी केली. गुरबाज 281 धावा करत टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. 


निकोलस पूरन
वेस्टइंडिजचा डावखुरा आक्रमक फलंदाज निकोलस पूरनने 146.16 च्या स्ट्राइक रेटने 228 धावा केल्या. टी20 क्रिकेटमध्ये सर्वश्रेष्ठ फलंदाज असल्याचं पूनने सिद्ध केलं आहे. अफगाणिस्तानविरुद्ध पूरनने 98 धावांची तुफान खेळ केली होती. या स्पर्धेतला हा सर्वोच्च स्कोर ठरलाय.


सूर्यकुमार यादव
टी20 वर्ल्ड कपमध्ये दोन अर्धशतंक आणि इंग्लंडविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये महत्त्वपूर्ण 47 धावा. टीम इंडियाच्या अडचणीच्या काळात सूर्यकुमार यादव मदतीला धावून आला आहे. दोन्ही नॉकआऊट सामन्यात सूर्याने दमदार कामगिरी केली. इंग्लंडविरुद्धच्या सेमीफायनल सामन्यात सूर्याने 47 धावांची मॅचविनिंग कामगिरी केली. तर अंतिम सामन्यात बाऊंड्रीवर अशक्य झेल टिपत टीम इंडियाची विजयात मोलाची भूमिका बजावली. सूर्याने या स्पर्धेत 135.37 च्या स्ट्राइक रेटने 199 धावा केल्यात.


मार्कस स्टोइनिस
टी20 वर्ल्ड कपमध्ये मार्कस स्टॉईनिस ऑस्ट्रेलियासाठी एक्स फॅक्टर खेळाडू ठरला. ओमान आणि स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यात त्याने दमदार खेळी केली. ऑस्ट्रेलियावर ग्रुप-स्टेजमध्ये बाहेर पडण्याची नामुष्की ओढावली. पण स्टॉईनिसची कामगिरी लक्षात राहण्यासारखी झाली. त्याने 164.07 च्या स्ट्राइक रेटने 169  धावा केल्या. तर 10 विकेटही घेतल्या.


हार्दिक पांड्या
टीम इंडियात खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना हार्दिक पांड्याने अनेकवेळा टीम इंडियाला हात दिला आहे. तर सहावा गोलंदाज म्हणूनही त्याने महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम समन्यात हार्दिकने शेवटचं षटक टाकत टीम इंडियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. हार्दिकने या स्पर्धेत 151.57 च्या स्ट्राइक-रेटने 144 धावा केल्या. तर  7.64 च्या इकॉनमी रेटने 11 विकेट घेतल्या.


अक्षर पटेल
दमदार फलंदाजी, स्पर्धेतील सर्वोतम झेल आणि गोलंदाजीत महत्वपूर्ण स्पेल. यंदाच्या टी20 वर्ल्ड कप स्पर्धेत अक्षर पटेलने सर्वच क्षेत्रात आपली छाप उमटवली. अंतिम सामन्यात अक्षरने 23 धावात देत 3 विकेट घेतल्या. तर मधल्या फळीत फलंदाजीला येत 47 धावा केल्या. अक्षरने या स्पर्धेत  139.39 च्या स्ट्राइक-रेटने 92 धावा केल्या. तर 7.86 च्या इकॉनॉमी रेटने 9 विकेट घेतल्या.


राशिद खान
टी20 वर्ल्ड कपमध्ये सर्वात मोठा उलटफेर ठरला तो अफगाणिस्तानचा. बलाढ्या संघांना मागे टाकत अफगाणिस्तानने सेमीफायनलपर्यंत मजल मारली. या संघाचं नेतृत्व होत ते दिग्गज फिरकी गोलंदाज राशिद खानकडे. आपल्या संघाला नॉकआऊट राऊंडमध्ये पोहोचवत राशिद खानने इतिहास रचला. 


जसप्रीत बुमराह
टी20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाच्या विजयात सर्वात मोठी भूमिका बजावली ती प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहने या स्पर्धेचा बुमराह हा सर्वश्रेष्ठ गोलंदाज ठरला. या संपूर्ण स्पर्धेत बुमराहने 15 विकेट घेतल्या. अंतिम सामन्यात दोन विकेट घेत बुमराहने सामना टीम इंडियाच्या दिशेने वळवला होता.


अर्शदीप सिंह
टीम इंडियाचा युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिह या स्पर्धत 17 विकेट घेत फजलहक फारुखीबरोबर सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला. डाव्या हाताचा वेगवान गोलंदाजी अर्शदीपने जसप्रीत बुमराहला चांगली साथ दिली. बुमराह आणि अर्शदीपने पॉवर प्लेमध्ये विरोधी संघाला रोखण्याचं काम केलं. 


फजलहक फारूकी
अफगाणिस्तानचा आणखी एक खेळाडू फजलहक फारुखी अफगाणिस्तानच्या सेमीफायनलपर्यंतच्या प्रवासात महत्त्वाचा खेळाडू ठरला. फारुखीने 6.31 च्या स्ट्राईक रेटने 17 विकेट घेतल्या. युगांडाविरुद्ध फारुकीने 9 धावात पाच विकेट घेण्याची कामगिरी केली. 


12वा खेळाडू : एनरिक नॉर्खिया