दुबई: भारत विरुद्ध पाकिस्तान झालेल्या सामन्यात टीम इंडियाचा वाईट पराभव झाला. त्यानंतर आता टीम इंडियाला न्यूझीलंड विरुद्ध सामना जिंकणं महत्त्वाचं आहे. तो जर सामना जिंकला नाही तर टी 20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाकिस्तान सलग तीन सामने जिंकला आहे. तर दुसरीकडे न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही टीम चांगल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असं म्हटलं जातं की जो नाणेफेक जिंकतो तो सामना जिंकतो त्यामुळे विराट कोहली नाणेफेक जिंकू शकले का? याकडे सर्वांचं लक्ष आहे. पाकिस्तान विरुद्धच्या पराभवानंतरही विराट कोहली म्हणाला होता की, दुबईमध्ये नाणेफेक महत्त्वाची आहे. नाणेफेक जिंकण्याची भूमिका टीमसाठी खूप मोठी असते. 


विराट कोहलीच्या नाणेफेक विक्रमावर बोलायचं तर तो फारचा चांगला नाही. एकूण आतापर्यंत झालेल्या सामन्यांचा विचार करायचा तर बऱ्यापैकी दोन किंवा तीन सामने वगळता जे संघ टॉस जिंकले आहे ते संघ सामनाही जिंकले आहेत. 


साऊथ आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया- टॉस जिंकला, 5 विकेट्सने ऑस्ट्रेलिया विजयी
विस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड- टॉस जिंकला,  6 विकेट्सने इंग्लंड विजयी
बांग्लादेश विरुद्ध श्रीलंका- टॉस जिंकला, 5 विकेट्सने श्रीलंका विजयी
भारत विरुद्ध पाकिस्तान- टॉस जिंकला, पाकिस्तान 10 विकेट्सने विजयी
अफगाणिस्तान विरुद्ध स्कॉटलंड- टॉस जिंकला, 130 धावांनी अफगाणिस्तान विजयी
साऊथ आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज- टॉस जिंकला, साऊथ आफ्रिका 8 विकेट्सने विजयी
न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान- टॉस जिंकला, 5 विकेस्टने पाकिस्तान विजयी
बांग्लादेश विरुद्ध इंग्लंड- इंग्लंड 8 विकेट्सने विजयी
स्कॉटलंड विरुद्ध नांबिया- टॉस जिंकला, नांबिया 4 विकेट्सने विजयी
श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया- 7 विकेट्सने ऑस्ट्रेलिया विजयी
वेस्ट इंडिज विरुद्ध बांग्लादेश- वेस्ट इंडिज विजयी
अफगाणिस्ता विरुद्ध पाकिस्तान- पाकिस्तान विजयी
श्रीलंका विरुद्ध साऊथ आफ्रिका- साऊथ आफ्रिका विजयी