Virat Kohli vs Babar Azam: हाय व्होलटेज सामन्यात रविवारी भारतीय क्रिकेट संघानं अखेरच्या चेंडूवर सामना जिंकला. हृदयाचे ठोके वाढवणाऱ्या या सामन्यामध्ये अनेक भावनांचा पूर आल्याचं पाहायला मिळालं. यामध्ये विराट कोहलीनं सर्वांचीच मनं जिंकली. अगदी विरोधात बोलणाऱ्यांनीही विराटची खेळी पाहून त्याला सलाम केलं. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमही यात मागे नव्हता. (T20 World Cup IND vs PAK babar azam on Virat Kohli )

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट़ (Virat kohli batting) एक सर्वोत्तम आणि मोठा खेळाडू असल्याचं म्हणत भारत- पाकिस्तान सामन्याचं खेळाडूंवर बरंच दडपण असतं ही बाब स्वीकारली.

काय म्हणाला बाबर?
गेल्या काही वर्षांमध्ये बाबर आझम आणि विराट कोहली यांच्यामध्ये अनेकांनीच तुलना केली. पण, अखेर रविवारी विराटनं इथंही बाजी मारत आपलं वर्चस्व सिद्ध केलं. सामन्याॉनंतर याविषयी प्रतिक्रिया देत विराटचं कौतुक करत बाबर म्हणाला, 'पहिल्या 10 षटकांमध्ये आमच्या खेळाडूंनी चांगलं प्रदर्शन केलं. पण, विराट आणि हार्दिकनं (Hardik pandya) सामन्याचा शेवट ज्या पद्धतीनं केला ते क्षण प्रशंसनीय.'

विराटनं सर्वोत्तम खेळी दाखवत त्याचं कौशल्य सर्वांपुढे ठेवलं असं सांगताना या सामन्याविषयीचं दडपण त्यानं शब्दांच मांडलं. दडपण असूनही त्यातून बाहेर पडणं महत्त्वाचं असतं, ही बाब अधोरेखित केली.


अधिक वाचा : भारताकडून हरल्यानंतर पाकिस्तानच्या ड्रेसिंग रुममधील Video व्हायरल!

विराट याच दडपणातून बाहेर आला आणि त्यानं खेळी आपल्या खांद्यावर सावरून नेली. त्याच्या खेळाचं प्रदर्शन हाच सामन्यातील टर्निग पॉईंट होता, असं म्हणत बाबरनं विराटचं तोंड भरून कौतुक केलं.


फक्त बाबर आझमच नव्हे, तर अनेक दिग्गज खेळाडूंनी विराटच्या या विराट खेळीचं कौतुक केलं. संघाला गरज असताना विराटनं दाखवलेला समजुतदारपणा आणि खेळाडून प्रतिस्पर्धी संघाला दिलेलं उत्तर पाहता येणाऱ्या काळात टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघासाठी हा खेळाडू मोठा आधार ठरणार यात शंका नाही.