T20 World Cup : ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतून (T20 World Cup) महत्त्वाची बातमी समोर आली आहे.  नेदरलँड्ने (Netherlands) पराभव केल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) संघ पुन्हा एकदा 'चोकर' असल्याचे सिद्ध झाले. रविवारी सकाळी अॅडलेडच्या ओव्हल मैदानावर खेळल्या  सामन्यात नेदरलँड्ने मोठा उलटफेर करत आफ्रिकेला पराभूत केलं. नेदरलँडच्या या विजयामुळे टीम इंडियासाठी (Team India) सेमी फायनलचं (semi final) तिकीट फायनल झालं.  (T20 World Cup Ind vs Pak Final match equation)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 त्यामुळे टीम इंडियाचा झिम्बाब्वेविरुद्ध होणाऱ्या सामन्यात पराभव झाला तरी फरक पडणार नाही. मात्र भारताने हा सामना जिंकला तर पाकिस्तानसोबत (Pakistan) अंतिम लढत (Final) पाहायला मिळण्याची शक्यता आहे.


पाकिस्तानने अॅडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या शेवटच्या सुपर-12 सामन्यात बांगलादेशचा 5 गडी राखून पराभव करून वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत आपली जागा निश्चित केली आहे.


दरम्यान, जर भारताचा झिम्बावेविरुद्धच्या सामन्यात विजय झाला तर इंग्लडविरुद्ध आणि पराभव झाला तर न्यूझीलंडविरुद्ध सामना होणार आहे. तसेच जर पाकिस्तानचा सामना न्यूझीलंडशी झाला तर भारताचा सामना इंग्लडसोबत होईल. जर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांनी आपल्या समोरच्या संघाना पराभूत केले तर भारत पाकिस्तान असा महामुकाबला पाहायला मिळू शकतो.