मुंबई : सध्या सर्व क्रिकेटप्रेमी एकाच दिवसाची वाट पाहतायत. तो दिवस म्हणजे पुढचा रविवार. 23 ऑक्टोबर रोजी क्रिकेटच्या मैदानावर मोठं महायुद्ध रंगणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये मेलबर्नमध्ये वर्ल्डपकपचा सामना होणार आहे. मात्र यापूर्वीच चाहत्यांच्या या आनंदावर पाणी फिरू शकतं. आणि यामागचं मोठं कारण ठरू शकतो तो म्हणजे पाऊस.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

T20 वर्ल्डकप 2022 मध्ये, 23 ऑक्टोबर रोजी होणार्‍या भारत-पाकिस्तानच्या हाय-व्होल्टेज सामन्याची मजा मेलबर्नचं हवामान खराब करू शकतं. मेलबर्नमध्ये त्या दिवशी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. त्यामुळे क्रिकेटच्या महायुद्धाचा खेळ पावसामुळे खराब होण्याची भीती आहे. 


IND vs PAK सामन्यापूर्वी वाईट बातमी


वेदर फोरकास्ट एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, 20 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियातील 3 राज्यांवर पावसाचा प्रभाव दिसून येईल. यावेळी हवामानही थंड राहणार आहे. मेलबर्नमध्येही हवामान असंच राहण्याची शक्यता आहे.


हवामानाची माहिती वेबसाइट AccuWeather प्रमाणे, 23 ऑक्टोबर रोजी सकाळी मेलबर्नमध्ये पाऊस पडू शकतो. त्यानंतर दिवसभर आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे एक दिवस अगोदर म्हणजे 22 ऑक्टोबर रोजी सामन्याच्या एक दिवस आधी वातावरण ढगाळ राहील. तर दुपारनंतर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. इतकंच नाही तर तो दिवस संपूर्ण पावसाची संततधार होऊ शकतो.


वर्ल्डकपपूर्वी आयसीसीने सर्व कर्णधारांची प्रेस कॉन्फरन्स आयोजित केली होती. यावेळी कॅप्टन रोहित शर्माने (Rohit Sharma) पत्रकार परिषदेत अनेक उत्तरं दिली. तसंच पाकिस्तान विरुद्ध टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन कशी असेल, याबाबतही रोहितने संकेत दिले आहेत.


"पाकिस्तान विरुद्ध 23 ऑक्टोबरला होणाऱ्या सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन ठरलीय. जे खेळाडू खेळणार आहेत, त्यांना मी सांगितलंय", असं रोहित म्हणाला.  


"जितके खेळाडू आहेत, त्यांच्याकडून चांगली कामगिरी करुन घेणं इतकंच आपल्या हातात असतं. याशिवाय आपण काहीच करु शकत नाहीत. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याआघी टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन सज्ज आहे. जे खेळाडू खेळणार आहेत, त्यांना सज्ज राहण्यासाठी सांगितलं गेलंय. खेळाडूंना सज्ज राहण्यास सांगणं हे योग्य असतं", असंही रोहितने स्पष्ट केलं.