IND vs SA : विजयानंतर टेम्बा बावुमाने उडवली भारतीय संघाची खिल्ली; म्हणाला, `आम्ही स्वतःला...`
दक्षिण आफ्रिकेने भारताचा पाच विकेटने धुव्वा उडवला
T20 World Cup 2022 : टी-20 विश्वचषक 2022 च्या (T20 World Cup 2022) 18व्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा (ind vs sa) पाच गडी राखून पराभव करून या स्पर्धेत तिसरा विजय नोंदवला आहे. यासह दक्षिण आफ्रिकेचा (south africa) संघ गुणतालिकेत (Point table) पहिले स्थानही पटकावले. भारतावरील विजयानंतर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाने (Temba Bavuma) आपल्या संघाचे कौतुक केले आहे. यावेळी आफ्रिकन कर्णधाराने भारतीय संघाची खिल्ली उडवत आपला संघ इतरांप्रमाणे स्वतःला फेव्हरेट म्हणत नाही, असे म्हटले आहे. दक्षिण आफ्रिकेने (south africa) तीन सामन्यांतून दोन विजयांसह पाच गुणांसह गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे, तर भारत (Team India) दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. भारत आणि बांगलादेशचे (bangladesh) प्रत्येकी चार गुण आहेत. (T20 World Cup IND vs SA After win south africa caption Temba Bavuma mocked team India)
बावुमाने सामन्यानंतर सांगितले की, "10 षटकांनंतर आम्हाला फलंदाजीमध्ये गती मिळाली. मला सोडून आमची फलंदाजी चांगल्या फॉर्ममध्ये आहे. आम्ही गेल्या काही काळापासून एक संघ म्हणून खेळत आहोत. सामन्यापूर्वी आम्ही येथील सामने पाहिले होते. इथे अतिरिक्त बाऊन्स मिळत होता, ज्याची आम्ही काळजी घेतली. आम्ही खेळाडू मिड ऑन आणि मिड ऑफला वर ठेवले होते. आम्हाला फेव्हरेट म्हणायला आवडत नाही, आम्ही फेव्हरेट म्हणून टूर्नामेंटमध्ये आलो नाही. आम्ही रडारच्या खाली उडत राहू. नेहमीच सुधारणा करत राहणे महत्त्वाचे आहे आणि आम्ही तेच करत आहोत."
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघाचे भवितव्य आता त्यांच्याच हातात आहे. मात्र, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ आता यापुढील सामने हलक्यात घेऊ शकत नाही. भारताला आता सुपर 12 च्या ग्रुप-2 मधील त्यांचे दोन उर्वरित सामने बांगलादेशविरुद्ध 2 नोव्हेंबरला आणि 5 नोव्हेंबरला झिम्बाब्वेविरुद्ध खेळायचे आहेत. भारत तीन सामन्यांतून चार गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे आणि त्याचा नेट रनरेट +0.844 आहे. तर दक्षिण आफ्रिका तीन सामन्यांतून दोन विजयांसह पाच गुणांसह अव्वल आहे आणि त्यांचा नेट रनरेट +2.772 आहे.
दरम्यान, रविवारी पर्थच्या मैदानावर खेळवल्या गेलेल्या सामन्याच्या पहिल्या 10 षटकांमध्ये दक्षिण आफ्रिकेचे वर्चस्व होते. पण दिनेश कार्तिक आणि सूर्य कुमार यादव यांच्या भागीदारीमुळे त्यांना थोडी चांगली धावसंख्या उभारण्यात यश आले. पण वेन पेर्नेलने 16व्या षटकात दिनेश कार्तिकला बाद करून ही जोडी फोडली. मात्र, दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांसमोर भारताची फलंदाजी पूर्णपणे हतबल दिसत होती आणि सातत्याने विकेट पडतच होत्या
लुंगी एनगिडीने प्राणघातक गोलंदाजी करत भारताच्या स्टार फलंदाजांना बाहेरचा रस्ता दाखवला. यामध्ये कर्णधार रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली आणि हार्दिक पांड्या यांचा समावेश आहे. त्याआधी भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. रविवारी संघातही बदल करण्यात आला. अक्षर पटेलच्या जागी दीपक हुडाची नियुक्ती करण्यात आली आहे. पण दीपक काही विशेष कामगिरी करू शकला नाही.