Drushil Chauhan : टीम इंडियाचा T20 World Cup साठी सज्ज झाली आहे. नेट प्रॅक्टिसमध्ये (Team India Net Practice) टीम इंडियाचे खेळाडू घाम गाळताना दिसत आहेत. अशातच बीसीसीआयने (BCCI) सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो पाहता पाहता तुफान व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये एक 11 वर्षीय गोलंदाज टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचा (Rohit Sharma) नेटमध्ये सराव करताना दिसतोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या स्पर्धेसाठी टीम इंडिया ब्रिस्बेनला (Team India in Brisbane) पोहोचली आहे, त्याआधी टीम पर्थमध्ये सराव करत होती. पर्थमध्ये एक 11 वर्षांच्या तरुण फलंदाजांना बॉलिंग करत होता. द्रुशील चौहान (Drushil Chauhan) असं त्या चिमुकल्याचं नाव. या गोलंदाजाचा खेळ पाहून रोहित चिमुकल्याला बोलवलं. गोलंदाजी करताना रोहित शर्माने द्रुशीलला भारतीय ड्रेसिंग रूममध्ये (Dressing room) बोलावून त्याची भेट घेतली. 


बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये द्रुशील चौहानने सांगितलंय की, तो डावखुरा वेगवान गोलंदाज आहे आणि द्रुशील कमालीचा इनस्विंग यॉर्कर  (Inswinging yorker) आणि आऊटस्विंगर (Outswinger) करतो. रोहित शर्माने द्रुशील चौहानला नेटमध्ये गोलंदाजी करण्याची संधी दिली आणि त्याला ऑटोग्राफ देखील दिला. एवढंच नाही तर रोहितने या चिमुकल्याला ऑफर देखील दिली आहे.


पाहा व्हिडीओ- 



दरम्यान, भारतासाठी खेळणार का? जर तू पर्थमध्ये (Perth) राहिलास तर भारतासाठी कसा खेळणार?, असं रोहितने चिमुकल्याला विचारलं. मी भारतातही येणार आहे, पण तो कधी येईल हे माहित नाही, असं उत्तर त्याने रोहितला दिलं. त्याचं उत्तर ऐकून रोहित देखील खुश झाला. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचं पहायला मिळतंय.