20 World Cup : जगभरात सध्या टी20 वर्ल्डकपची धुम आहे. येत्या रविवारी 13 नोव्हेंबरला त्याचा अंतिम सामना रंगणार आहे. या सामन्यानंतर लगेचच फिफा वर्ल्ड कपला (FIFA World Cup 2022) सुरूवात होणार आहे. त्यामुळे अनेकांना असा प्रश्न पडलाय की कोणत्या स्पर्धेतून खेळाडू जास्त कमवतात. म्हणजे टी20 वर्ल्ड कप (T20 World Cup) खेळणारे खेळाडू सर्वाधिक कमवतात की फिफा वर्ल्ड कप खेळणारे खेळाडू जास्त कमवतात?याच प्रश्नाचे उत्तर या बातमीतून जाणून घेऊयात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे ही वाचा : IPLच्या प्रश्नावर बाबर आझमची बोलती बंद, VIDEO आला समोर 


भारतात क्रिकेट हा धर्म मानला जातो. इथे लोकांमध्ये क्रिकेटची क्रेझ वेगळ्याच पातळीवर पाहायला मिळते. असे असले तरी भारतात लाखो फुटबॉल चाहते देखील आहेत.जे फिफा (FIFA World Cup 2022) सारखी मोठी स्पर्धा बघतात. यासोबत लिओनेल मेस्सी, क्रिस्टियानो रोनाल्डो आणि नेमार या स्टार खेळाडूंचे वेडे असणारे फुटबॉल चाहतेही आहेत. विशेष म्हणजे या स्पर्धेत भारताचा संघ नसून देखील हे फॅन्स ही स्पर्धा आवडीने बघतात.  
 
फिफा वर्ल्ड कपमध्ये (FIFA World Cup 2022) खेळणाऱ्या खेळाडूंना किती मॅच फी मिळते? ही मॅच फी आणि टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) खेळणाऱ्या खेळाडूंच्या मॅच फीमध्ये काय फरक आहे? हे खाली पाहूयात. 


T20तील टॉप-5 संघातील खेळाडूंची मॅच फी


  • भारतीय संघ - 3 लाख रूपये

  • ऑस्ट्रेलियन संघ - 4.44 लाख रुपये

  • इंग्लंड संघ - 5.1 लाख रुपये

  • न्यूझीलंड संघ - 2 लाख रुपये

  • पाकिस्तान संघ - 1.38 हजार रुपये


FIFA तील टॉप-5 संघांच्या खेळाडूंची मॅच फी


  • ब्राझील - सुमारे 4.85 लाख रुपये

  • जर्मनी - सुमारे 2.65 लाख रुपये

  • फ्रान्स - सुमारे 3.31 लाख रुपये

  • इंग्लंड - सुमारे 2.48 लाख रुपये

  • स्पेन - अंदाजे 2.90 लाख रुपये


दरम्यान फिफा वर्ल्ड कपमधील (FIFA World Cup 2022) टॉप-5 संघांच्या खेळाडूंच्या मॅच फीची टी-20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup)  टॉप-5 टीम्सच्या मॅच फीशी तुलना केली, तर तुमच्या लक्षात येईल की त्यात फारसा फरक नाही. प्रत्येक संघ त्याच्या करारानुसार ही मॅच फी स्वतंत्रपणे भरतो. क्रिकेट आणि फुटबॉलमध्ये हेच धोरण आहे.